तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश; परळी शहराला वीजपुरवठा करण्यासाठी दाऊतपुर वरून दुसरी लाईन सज्ज


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहराला वीजपुरवठा करणाऱ्या डाबी येथील १३२ केव्ही सबस्टेशन मध्ये काही फॉल्ट झाला की परळी शहर अंधारात असायचं! परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आता यावर पर्यायी उपाय काढला आहे.

आता परळी शहरासाठी सिमेंट फॅक्टरीकडे येणारी दाऊतपूर ३३ के.व्ही. वीज लाईन कालरात्री देवी सबस्टेशनला जोडण्यात आली आहे. या लाईनचे परीक्षण यशस्वी झाले असून वापरही सुरूः करण्यात आला आहे.

यामुळे डाबी सबस्टेशनला आता पर्यायी व्यवस्था झाली असून, डाबी कडील वीज पुरवठ्यात काही अडथळा निर्माण झाला तरी या दुसऱ्या लाईनमुळे परळीकरांना अखंडित वीज मिळणार आहे.

याबाबत ना. धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार दि.३१ मार्च रोजी बीड महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. सरग व अंबेजोगाई विभागाचे कार्यकारी अभियंता कुरेशी यांनी या कामाची पाहणी करून तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. 

आजपर्यंत परळी शहराला डाबी १३२ केव्ही या एकाच सबस्टेशनवरून वीज पुरवठा केला जात होता. या सबस्टेशनला काही अडथळा निर्माण झाला तर परळी शहरात वीज पुरवठा करण्यासाठी इतर पर्यायी व्यवस्था नव्हती. मात्र आता धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून ही व्यवस्था झाली असून, दोन्ही पैकी एकही फीडरचा वीज पुरवठा खंडित झाला तर दुसऱ्या पर्यायी व्यवस्थेमुळे अवघ्या दहा मिनिटात खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत होऊन परळीकरांना अंधारात राहावे लागणार नाही.

या कामाला युद्धपातळीवर अवघ्या १३ दिवसात पूर्ण करण्यात आले असून यानिमित्त परळीकर ना. धनंजय मुंडे यांचे व महावितरणचे आभार व्यक्त करत आहेत. या जोडणीला पूर्ण करण्यासाठी बीडचे अधीक्षक अभियंता सरग यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाईचे कार्यकारी अभियंता कुरेशी, परळीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आंबाडकर, सहाय्यक अभियंता जिलानी व कटके यांसह परळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a comment