तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 April 2020

परळीत गरजु कुटुंबाला जय भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. माधव जाधव यांनी दिला आधार


 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  सध्या लाॅकडाऊन व संचारबंदी असल्याने कामधंदा व रोजगार बंद आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबावर ऊपासमारीची वेळ आली आहे.
       जय भारती प्रतिष्ठानच्या वतीने अंबाजोगाई येथील सरकारी व खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या रूग्णांना व रूग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देण्याचा निर्णय घेऊन गेल्या 23 दिवसापासून सतत अखंडितपणे रूग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देण्याचा उपक्रम चालू असुन दररोज 200 ते 210 गरजूंना जेवणाचे डब्बे दिले जात आहेत. तसेच शासकीय कर्मचारी जे संरक्षणासाठी आलेले असतिल त्यांच्या जेवणाची सोय गरजेनुसार  केली आहे. अनेक गरजू कुटुंबाला अन्नधान्य व किराणा सामान देऊन जय भारती प्रतिष्ठाणने आधार दिला आहे. 

परळी येथील शेख आरेफ सादिक यांच्या कुटुंबात एकूण 7-8 सदस्य असून त्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठीकाहीही साधन नसल्यामुळे व कुटुंबाला ऊपासमारीची वेळ आली आहे. ही माहिती जय भारती प्रतिष्ठानचेअध्यक्ष अॅङ माधव जाधव यांना कळाल्यानंतर अॅङ माधव जाधव यांनी जय भारती प्रतिष्ठानच्या वतीने शेख आरेफ यांच्या कुटुंबाला अन्नधान्य व किराणा सामान पोहच केले.
 यावेळी युवा नेते बाबा शिंदे, अॅङ. रमेश साखरे, अॅड. गजानन पारेकर, न्यू सहारा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मोईन फारुकी व  अॅड सतिष देशमुख उपस्थित होते.

No comments:

Post a comment