तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 13 April 2020

कोरोना प्रादुर्भाव कमी होताच पुन्हा कापूस खरेदी- अँड. विष्णुपंत सोळंके


 अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्यात आणि मराठवाड्यातच आजही शेतकऱ्यांचा ३० % कापूस घरातच आहे यावर सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी कापूस खरेदी थांबविण्यात आली होती , मात्र हा प्रादुर्भाव कमी झाल्यास किंवा राज्य शासनाने सूचना दिल्यास पुन्हा कापूस खरेदी करण्याची तयारी पणन महासंघाने केली असून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही असे महाराष्ट्र राज्य कापूस पानं महासंघाचे उपाध्यक्ष विष्णुपंत सोळंके यांनी  म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात आजही कापूस हेच प्रमुख पीक आहे. मात्र जिल्ह्यातील कापसाची पूर्ण खरेदी झालेली नाही. जिल्ह्यात पणन महासंघ आणि सीसीआय यांनी खरेदी सुरु केली, मात्र लॉकडाऊन नंतर हि प्रक्रिया थांबली आहे. आता शेतकऱ्यांच्या घरात कापूस तसाच पडून असून त्याची खरेदी होणे गरजेचे होते. यावर, कापूस खरेदी आणि प्रक्रियेत अनेक कामगार सहभागी असतात, त्यांच्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून ही खरेदी काही काळासाठी थांबविण्यात आली आहे. पणन महासंघाने आतपर्यंत राज्यात ५४ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली असून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यास किंवा शासनाने निर्देश दिल्यास पणन  महासंघ   पुन्हा कापूस खरेदी सुरु करेल असे पणन महासंघाचे अध्यक्ष अनंत देशमुख आणि उपाध्यक्ष विष्णुपंत सोळंके यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a comment