तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 April 2020

कारखेड्यातील त्या दाम्पंत्याला पाणी टंचाई निवारणार्थ जनजागृतीसाठी जिल्ह्याचे ब्रॅन्ड अॅम्बेसिडर म्हणून निवड करासामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांची मागणी

२१ दिवसात घराच्या अंगणातच पकमोडे दांम्पत्याने खोदली विहीर

पाणी टंचाईवर मात करन्यासाठीचा नवा आदर्श

वाशिम (फुलचंद भगत)-जिल्ह्यातील कारखेडा गावच्या पकमोडे दांम्पत्यांनी चक्क आपल्या घराच्या अंगणातच २१ दिवसात विहीर खोदल्यामुळे पाणी टंचाई निवारनार्थ त्यांचे कार्य बघता त्यांना जलदुत आणी पाणीप्रश्नावर जनजागृती करन्यासाठी वाशिम जिल्ह्याचे ब्रॅन्ड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्त करा तसेच प्रोत्साहनपर आर्थिक मदतही द्या या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी जिल्ह्याचे पालकमंञी शंभुराज देसाई आणी सोबतच प्रशासनाकडे प्रसिध्दी पञकाव्दारे केली आहे.
         कोरोणा विषाणुच्या प्रार्दुभावाच्या संकटामुळे संपुर्ण देशामध्ये संचारबंदी लागु करन्यात आलेली असल्याने सध्यातरी सर्व कामे ठप्प असतांना मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करुन कोणत्याही यंञाचा वापर न करता घराच्या अंगणात केवळ २१ दिवसामध्ये वाशिम जिल्ह्यातील पकमोडे दांम्पत्यांने विहिर खोदल्याने जिल्ह्याचे पालकमंञी शंभुराज देसाई यांनी त्यांना पञ पाठवुन अभिनंदन करुन त्यांचे प्रोत्साहन वाढवले आहे.सामान्य कुटुंबाने केलेले हे काम,घेतलेले कष्ट निश्चीतच पाणी टंचाईवर मात करन्यासाठी नवी दिशा देणारे ठरणार आहे.यामुळे कारखेडा ता.मानोरा येथील त्या दाम्पत्याला प्रशासनाने पाणी प्रश्नाबाबत जनजागृतीसाठी जिल्ह्याचे ब्रॅन्ड अॅम्बिसिडर नियुक्त करुन प्रोत्साहनपर आर्थीक मदतही करावी अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी पालकमंञी आणी प्रशासनाकडे केली आहे.या नियुक्तीमुळे वाशिम जिल्हा पाणी प्रश्नाबाबत सजग होवून पाणी टंचाईवर मात करन्यासाठी लोकांना नवी दिशा मिळुन जनजागृती होईल असेही भगत यांनी सांगीतले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206/9763007835

No comments:

Post a comment