तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 April 2020

नगरपरिषद च्या कृपेने घरणीकर रोड वर नालीचे पूर्ण पाणी आले रोडवर ; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ न. प.प्रशासनाने थांबवावा-


प्रा पवन मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  येथील घरणीकर रोड ते अरुणोदय मार्केट कडे जाणारी नाली बऱ्याच दिवसांपासून  कचऱ्याने पूर्ण पणे भरल्या मुळे नाली ब्लॉक होऊन नालीचे पाणी रस्त्यावर आले आहे,त्या मुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे तरी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून ब्लॉक झालेली नाली नगरपालिका प्रशासनाने लवकर खुली करावी अशी मागणी नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.
         अगोदरच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने नागरिक धास्तावलेले आहेत,लॉकडाऊन मुळे नागरिक घरात बसून आहेत मात्र घरणीकर रोड वरील नाली कचऱ्याने संपूर्णपणे भरल्या मुळे पुर्णपणे ब्लॉक झालेली आहे,या ब्लॉक झालेल्या नालीचे पाणी आता रस्त्यावर आल्याने तेथे रोगराई होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे,नगरपालिका प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा या कडे कोणी  लक्ष देत नसल्याने तेथील नागरिक हतबल झाले आहेत आणि स्वतःचा जीव मुठीत ठेऊन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे,तरी न प प्रशासनाने सदरील गंभीर विषय लक्षात घेऊन तेथील नाली त्वरित मोकळी करावी अशी मागणी नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment