तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 April 2020

मजुर वर्गाला धान्याचे वाटपडोणगांव :-१५
 कोरोना सारख्या भयंकर वायरस मुळे सर्व जग संकटात सापडले आहे. त्याच बरोबर भारतात सुद्धा कोरोना व्हायरस ने आपले पाय पसरवत असल्या मुळे या वायरस पासून आपला बचाव करण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन केले आहे त्यामुळे सर्व कंपनी. दुकाने तसेच सर्व बांधकाम बंद झाले  आहेत त्यामुळे बांधकाम.ठेकेदाराना सुध्दा आर्थिक आडचन जानवत आहे त्याच बरोबर मजुर वर्गाला सुध्दा काही प्रमाणात आर्थिक व अन्नधान्या साठी त्रासाला सामोरे जावे लागत आहे परंतु डोणगांव येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य व बांधकाम ठेकेदार दिलुभाई शाहा व त्यांचे सहकारी रफिक भाई यांचे काम बंद असतांनाही यांनी आपल्या कामावरील  पन्नास ते साठ मजुरांना काही अडचण येवु नये म्हणून प्रत्येक मजुरांना एक एक महीन्याचे अन्नधान्याचे वाटप करण्यात आले यावेळी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते व भावी सदस्य सोहेल शेख रब्बानी, वसीम मॅकेनिकल, कुरशीद मॅकेनिकल, शकील पठाण, इम्रान खान, आमीर भाई मिस्त्री, व मजहर शाहा इत्यादी उपस्थित होते.

जमील पठाण
8805381333 /8804935111

No comments:

Post a comment