तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 10 April 2020

कोरोनाने भल्याभल्यांची नशाच उतरवली... मुंबई, पुण्याचे स्वयंघोषित मातब्बर जमीनीवर, खेडी पुन्हा गजबजली!मुंबई, पुण्याला आहोत, खुपच बिझी असतो, गावाकडे यायला सोड फोनवर बोलायलाही वेळ मिळत नाही अशा अनेक बडाया मारणारे स्वयंघोषित मातब्बर मंडळी आता जमीनीवर आली आहे. गड्या आपुला गाव बरा म्हणत सर्वजण पुन्हा एकदा काळ्या मातीशी नाळ जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत असताना दिसत आहेत. त्यामुळे खेडी बर्‍याच दिवसानंतर पुन्हा एकदा गजबजुन गेली आहेत, शहरी लोक पुन्हा " आपल्या माणसात" आली आहेत. अर्थात ही किमया साधली आहे ती कोरोना व्हायरस या जीवघेण्या रोगाने... कोरोनाचे वाईट परिणाम अतिशय दुरगामी असले तरी असे काही हळुवार चांगलेही परिणाम दिसू लागले आहेत. 
         गेल्या काही वर्षांत रोजीरोटीसाठी पुणे, मुंबईला जाणारांचे प्रमाण खुपच वाढले होते. शासकीय, निमशासकीय, कंपनी आदी ठिकाणी काम करणाऱ्यांची संख्या मोठी होती. चांगला पैसा-पाणी मिळत असल्याने आणि शेतीमध्ये केलेला खर्चही निघत नसल्याने जाणारे वाढले होते तर अनेकजणांना नशीबाने चांगली साथ दिल्याने तिकडेच स्थिरावलेही होते. मात्र इकडे माणुसकीने वागणारे तिकडे अचानक "शहरीबाबू" बणुन वागू लागले. अर्थात बर्‍याचजणांनी संस्कार जपले पण बरेचजण "अर्ध्या हळकुंडाने पिवळे" होऊन मिरवू लागले. गावाकडील लोकांवर इंप्रेशन मारण्यासाठी बढाया मारल्या जात. पुणे, मुंबई आणि इतर मोठ्या शहराचे आभासी चित्र आपल्या गावाकडच्या मित्रांसमोर मांडताना वस्तुस्थितीपासुन जाणीवपूर्वक दुर राहिले आणि ठेवले जायचे. त्यामुळे अनेकांना मोठ्या शहरात जाऊन स्थाईक होण्याची ओढ निर्माण झाली होती. 
       मोठ्या शहरातुन काही दिवसासाठी गावात आले तरी आपले वेगळेपण दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न कायम असायचा. राहणीमान आणि वागण्यातून त्यांचा शहरीपणा सतत उठून दिसेल याची काळजी सतत घेत असत. गावाकडे जाणे मुद्दाम टाळुन "बिझी" असल्याचे दाखवले जात असे. तसे बरेचजण "बिझी" असुनही गावाची नाळ कायम ठेवण्यासाठी प्रयत्नही करीत असत. 

कोरोना कहर, जवळ करू घर 

       पण अचानक वारे फिरले अन विचित्रच झाले. कोरोना व्हायरसचा प्रवेश भारतात झाला आणि अनेकांना "धरणी माय दे ठाय" असे झाले. विलाज नसलेल्या कोरोनाचा प्रकोप वाढू लागला आणि जो तो "आपले घर जवळ" करण्यासाठी धडपड करू लागला. शासनाने कठोर निर्बंध लावायला सुरुवात केल्याने शहरात जगणे अवघड होणार असल्याचे लक्षात येऊ लागले. त्यामुळे शहरात स्थाईक असलेल्यांनी गाव, घर जवळ करण्याच्या हालचाली सुरू केल्या. गाव सोडून शहरात स्थायिक झालेल्यांनी अगोदर आपला कुटुंब कबिला पाठवुन नंतर स्वतः ही गाव गाठले. कोरोनाच्या धास्तीने सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आणि प्रत्येकजण आपल्या गावात, माणसात जाण्यासाठी धडपड करू लागला. 
      एरवी बोलावूनही न येणारी मोठी माणसं गावात आपलेपणा दाखऊ लागली. गावाकडे आलेल्यांची संख्या खुपच मोठी आहे.

खेडी पुन्हा गजबजली! 

      ओस पडत चाललेली खेडी, शहरी माणसे मोठ्या प्रमाणात गावी आल्याने खेडी पुन्हा एकदा गजबजुन गेली आहेत. मुंबई, पुण्यावरून आलेल्यांकडे संशय आणि काळजीने बघत असले तरी सुरक्षित अंतर ठेवून ख्याली खुशाली विचारली जाऊ लागली आहे. 
      सध्या शहरांसह ग्रामीण भागातही लाॅक डाऊन, संचारबंदी असल्याने नागरीक रस्त्यावर फिरताना दिसत नाहीत. पण माणसांनी भरलेल्या घराची ओळख लगेच लक्षात येते. त्यातच शेतीच्या कामांना परवानगी असल्याने शेतातील वर्दळही लक्षात येते. 
    कोरोनाने अक्षरशः भल्याभल्यांना जमीनीवर आणले असुन दुर चाललेला माणुस माणसाजवळ नक्कीच आणला आहे.

No comments:

Post a comment