तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 April 2020

मुंबईत सोशल डिस्टिंक्शनचे वाजले तीन तेरा वांद्रे स्थानकात तुफान गर्दी

बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई : सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर बसवत लॉकडाऊनच्या काळात वांद्रे स्थानकात आपापल्या गावी जाण्यासाठी मोठ्या संख्येने मजूरांची गर्दी जमली आहे. सायंकाळी चार वाजल्यापासून हजारोंच्या संख्येने नागरिक जमले असल्याने प्रचंड गोंधळ उडाला आहे. वांद्रे स्थानक हे बाहेरील राज्यांमध्ये जाण्यासाठी महत्वाचे स्थानक मानले जाते. लॉकडाऊनच्या काळात अशाप्रकारे मजूरांचा मोठ्या संख्येने जमण्याची पहिलीच वेळ आहे. यापूर्वी सूरतमध्ये रस्त्यांवर मजूर मोठ्या प्रमाणावर गोळा झाले होते
एकीकडे देशात आणि राज्यात लॉकडाऊन वाढवलेला असताना मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्टेशनवर  हजारो लोकांनी गर्दी केली. उत्तर प्रदेश, बिहार येथील हे कामगार त्यांच्या मुळ ठिकाणी पोहोचण्यासाठी येथे जमले होते. गावाला जाण्यासाठी रेल्वे सोडण्यात यावी, अशी मागणी या कामगारांनी केली होती.
शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्याचं खापर केंद्र सरकारवर फोडलं आहे. 'केंद्र सरकारने कामगारांना त्यांच्या घरी परत पाठवण्यासाठी कोणताच निर्णय घेतला नसल्यामुळे वांद्रे स्टेशनबाहेर अशी परिस्थिती निर्माण झाली. सुरतमध्ये झालेली दंगलही याचाच परिणाम आहे. या कामगारांना अन्न किंवा घर नकोय, त्यांना त्यांच्या घरी जायचं आहे,' असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

No comments:

Post a comment