तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 April 2020

पंकजाताई मुंडे यांच्यामुळेच ऊसतोड कामगारांना मिळाला न्याय - केशवराव आंधळे


मुंडे साहेबांची कमी पंकजाताईंनी भासू दिली नाही- राजेंद्र मस्के

आता श्रेय घेण्यासाठी मात्र झारीतले शुक्राचार्य सर्वात पुढे - सर्जेराव तांदळे

बीड (प्रतिनिधी) :-  आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच ऊसतोड कामगारांना न्याय मिळाला आहे अशी प्रतिक्रिया माजी आमदार केशवराव आंधळे यांनी व्यक्त केली आहे तर ऊसतोड कामगारांना  पंकजाताईंनी लोकनेते मुंडे साहेबांची कमी भासू दिली नाही असे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी म्हटले आहे. पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न सुटला असताना याचे श्रेय घेण्यासाठी आता झारीतले शुक्राचार्य सर्वात पुढे आले आहेत अशी खरमरीत टिका भाजप नेते सर्जेराव तांदळे यांनी केली संयुक्त पत्रकाद्वारे केली आहे. 

   बीड, अहमदनगर व इतर जिल्हयातील हजारो ऊसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्र व अन्य भागातील विविध साखर कारखान्याच्या परिसरात अडकून पडले होते, त्यांची आरोग्य तपासणी करावी आणि त्यांना सुरक्षितपणे घराकडे पाठवावे अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनीच सातत्याने सरकारकडे लावून धरली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, लवादाचे नेते जयंत पाटील यांच्याशीही त्या बोलल्या होत्या,  ऊसतोड मजूरांशी देखील त्या दररोज संवाद साधून त्यांना धीर देत होत्या, त्यांची सुरू असलेली तळमळ तमाम कामगारांच्या लक्षात येत होती, सत्तेत असताना कामगारांच्या संपात त्या सहभागी झाल्या होत्या आणि आता सत्तेत नसतांना, कुठल्याही पदावर नसतांना त्यांनी आमच्या लढयाला ताकद दिली असे केशवराव आंधळे यांनी म्हटले आहे. 

मुंडे साहेबांची कमी भासू दिली नाही- राजेंद्र मस्के

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांप्रमाणेच पंकजाताई मुंडे हया देखील संकटकाळात ऊसतोड मजूरांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिल्या आणि अखेर शासनाने काढलेल्या आदेशाने ऊसतोड कामगारांना दिलासा मिळाला, मुंडे साहेबांची कमी त्यांनी कामगारांना भासू दिली नाही, आता सर्व कामगार आपापल्या घरी सुखरूप पोहोचतील असे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के म्हणाले.

झारीतले शुक्राचार्य श्रेयासाठी पुढे - सर्जेराव तांदळे

ऊसतोड मजूरांच्या प्रश्नांशी ज्यांना कसलेही देणेघेणे नाही, सत्ता  असूनही ज्यांनी  कामगारांसाठी कसलाही हालचाल केली नाही अथवा पालक म्हणून वर्तणूक केली नाही, त्यांनी केवळ झारीतल्या शुक्राचार्याची भूमिका वठवली आणि केवळ राजकारणासाठी पंकजाताई मुंडे यांच्यावर टीका केली आता तेच टिका करणारे  शुक्राचार्य श्रेय घेण्यासाठी मात्र सर्वात पुढे आले आहेत अशा शब्दांत सर्जेराव तांदळे   यांनी पालकमंत्र्यांवर शरसंधान साधले.

No comments:

Post a comment