तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 April 2020

कोरोनाच्या संकटात आर्थिक गणित कोलमडली ; छोटे-मोठे व्यवसायिक, किरकोळ विक्रेते, यांच्यावर आर्थिक संक्रांत ओढवली असून कोट्यावधींची उलाढाल ठप्प


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
सध्या देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून  आवश्यक सेवा वगळता सर्व गावठी बाजार,आठवडी बाजार प्रशासनाच्या आवाहनानुसार बंद केले आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील छोटे-मोठे व्यवसायिक, किरकोळ विक्रेते, यांच्यावर आर्थिक संक्रांत ओढवली असून जिल्हाभरातील कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली आहे.
कोरोना संसर्गजन्य विषाणूने अवघ्या जगभरात थैमान घातले आहे. त्याचे लोण सर्वत्र पसरल्याने जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाभरातील नगरपालिका,नगरपंचायत व ग्रामपंचायतींनी आपल्या कार्यक्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता गावठी बाजार,आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र अशा बाजारांवर कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या व्यावसायिक,किरकोळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
 आठवडी बाजारावर कापड दुकानदार, भांडी विक्रेते, हॉटेल व्यवसाय, बेकरी व्यवसाय, फळविक्रेते, फुल विक्रेते त्यांचा चरितार्थ हा निव्वळ बाजारावर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातून उकडे तांदूळ,केरसुणी, गावठी भाजीपाला, फणस,आंबे, ओले काजुगर यांची विक्री बाजारपेठेत करून मिळालेल्या पैशातून आपल्या घरात आठवड्या पुरते लागणारे रेशन खरेदी करत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातील बाजारपेठा बंद असून छोट्या-मोठ्या व्यवसायीकां बरोबर किरकोळ विक्रेत्यांवर संक्रांत ओढवली असून कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली आहे.

No comments:

Post a comment