तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 April 2020

वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण करण्यावर घातलेले निर्बंध मागे घ्या– मनोहरराव सुने
हिंगोली  (प्रतिनिधी) :- वृत्तपत्रांच्या वितरणातून कोरोनाचा फैलाव होत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) स्पष्ट केलेले असले तरीही काळजी म्हणून छपाईनंतर वृत्तपत्रांचे निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्स आणि इतर काळजी घेऊन वृत्तपत्र विक्रेत्यांकडून वितरण सरु आहे.

असे असताना अचानक मार्गदर्शक सुचनांमध्ये बदल करुन घरोघरी वितरणावर बंदी घालण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तरी सदर निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण  पत्रकार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख यांनी केली आहे.

कोरोना च्या लढ्यामध्ये वृत्तपत्रे महत्वाची भूमिका बजावत आहेत. राज्य सरकारकडून सुरु असणारे अत्यंत चांगले व सकारात्मक प्रयत्न वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे तसेच जनजागृती करण्याचे कार्य वृत्तपत्रे करीत आहेत. वृत्तपत्रांच्या माध्यमातून विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचत आहे. याचमुळे वाचकांनाकडूनही वृत्तपत्रांना मागणी आहे. असे असताना राज्य शासनाने अचानक घेतलेला निर्णय चुकीचा असून हा निर्णय मागे घ्यावा, याबाबत आपण सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण  पत्रकार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने  प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कैलासबापू देशमुख यांनी निवेदनाद्वारे सादर केले आहेस 


तेजः न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment