तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 27 April 2020

स्व.पंडीतअण्णा मुंडे शेतकरी भोजनगृहातून भागतेय अनेकांची भुक ; शिवभोजन केंद्र मान्यतेने पाच रुपयात थाळीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
   परळी शहरात कामानिमित्त येणार्‍या तालुक्यातील शेतकर्‍यांना  सुविधा व्हावी म्हणून नाथ प्रतिष्ठानच्या वतीने चालवल्या जाणार्‍या स्व.पंडीतअण्णा मुंडे शेतकरी भोजन गृहात  नेहमीसाठी केवळ 10 रूपयात जेवण मिळत होते.आता याच ठिकाणी शिवभोजन केंद्र मान्यता दिल्याने  केवळ पाच रुपयात जेवण मिळत आहे. 15 आँगस्ट 2018 रोजी  ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते या भोजन गृहाचा शुभारंभ झालेला आहे.  परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मोकळ्या जागेत हे भोजन गृह असून, परळीत धान्य खरेदी, विक्री, शेतीविषयक व जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी येणार्‍या शेतकर्‍यांना या भोजन गृहात अनेक दिवसांपासून 10 रूपयांमध्ये जेवणाचा लाभ घेता येत आहे. आता या ठिकाणी शिवभोजन केंद्र मान्यतेने  पाच रुपयात थाळी उपलब्ध झाली असूनअनेकांची भुक हे भोजनगृह भागवत आहे.
        दुष्काळ परिस्थितीत आर्थिक द़ृष्ट्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना परळीत आल्यानंतर अल्प दरात जेवण मिळवुन त्यांना आधार देण्याच्या उद्देशाने धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. यात जेवणासाठी येणार्‍या खर्चापैकी शेतकर्‍यांकडून फक्त 10 रूपये तर उर्वरित खर्च नाथ प्रतिष्ठान करते.19 एप्रिल रोजी या ठिकाणी शिवभोजनाची मान्यता मिळाली आहे. याव्दारे पाच रूपयात भोजनाची व्यवस्था गरीब व गरजुंना करण्यात आली आहे. शासनमान्य व्यवस्था केली आहे. सध्या 100 थाळीची मान्यता  आहे. दोन्ही केंद्राच्या माध्यमातून सध्या शिवभोजनचे 100 तर स्व.पंडितअण्णा मुंडे शेतकरी भोजनगृहाची 90 ते 100 थाळी  देण्यात येत आहेत. गरजुंची संख्या  11 ते 3 या वेळेत मोठी असते.
 प्रचंड प्रतिसाद पहाता भाविष्यात थाळी संख्या वाढविण्याची गरज आहे.गराजुची संख्या जास्त असल्या मुळे भोजन पार्सलचे 12 वाजे पर्यंतच 100 चा अकड़ा पार होत आहे
         शिवभोजन स्वयंसेवक व स्व. पंडित अण्णा मुंडे शेतकरी भोजनगृहाचे व्यवस्थापक आणि शवास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड. मनजीत सुगरे, अँड गजानन पारेकर, व रणजीत सुगरे इतर सात जण आहेत. याठिकाणी दररोज पंचायत समिती, नगर परिषद, तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी दररोज आढावा घेत आहेत. भव्य दिव्य चौबाजुने गार्डन, उत्कृष्ट नियोजन, सीसीटीव्ही कॅमेरे,इत्यादि बाबीसह या भोजन गृहाची इमारत मोढ़ा परिसरात सुसज्ज इमारत आहे.सोशल डिस्टन्सींग, फिल्टर पाणी, सेनिटरायझर, हँण्डवाँश, हँण्डग्लाज, हेड कँप, इत्यादि सेवेसह उत्कृष्ट जेवण तयार केले जाते. ह्या वास्तुला शोभा आणून बाजार समिती परिसराची शोभा वाढविली, स्वच्छ व निरोगी परिसर आहे.जेवनातील मेनू चपाती, दाळ भात , वरण, दररोज वेगळी भाजी करण्यात येते तसेच स्वच्छता असल्यामुळे व्यापारी, शेतकरी नागरिक यांना प्रसन्न वातावरण निर्माण झाल्यामुळें समाधान व्यक्त करीत आहेत.
         तसेच या ठिकाणी सामाजिक बंधिलकी म्हणून गरजुवंत व्यक्ती पार्सल घेण्यासाठी आल्यावर त्यांना मास्कचे वाटप करण्यात येत आहेत. आतापर्यंत 500 मास्क वाटप करण्यात आले आहे. सध्या उन्हाळा दिवस असल्यामुळे व लाँकडाऊन असल्यामुळे आणवाणींना पादत्राणे भेट दिली आहेत.
 @@@
      गराजुची वाढती संख्या पाहतां शिवभोजन व शेतकरी भोजनगृहातून भविष्यात कुणीही उपाशीपोटी जाऊ न देण्यासाठी थाळी वाढविण्यात याव्यात असे वाटते.भविष्यात गोरगरीबांची व शेतकरी, दिनदुबळ्यांची स्व.पंडीत अण्णा मुंडे शेतकरी भोजनगृह व शिवभोजन यांच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली आहे.आणि ही सेवा आणखी वाढविण्याचा मानस आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांनी जी जबाबदारी माझ्या विश्वास पुर्वक त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आहे.
                 -अँड. मनजीत सुगरे,
                   शिवभोजन चालक

No comments:

Post a comment