तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 13 April 2020

कोरोनाच्या महाभयंकर संकटात पदवी, पदव्युत्तर विभागातील सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करावे , जनक्रांती सेनेचे महादेव गित्ते ; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- सध्या देशात उदभवलेलं 'कोरोना' हे या शतकातील अभूतपूर्व असे जागतिक संकट आहे. आपण सारे भारतीय त्याचा जोरदारपणे सामना करीत आहोत. अशा परिस्थितीत पदवी व पदव्युत्तर विभागाच्या पुढे ढकलून सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करावे अशी मागणी जनक्रांती सेनेचे महादेव गित्ते यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे ई-मेल व्दारे केली आहे. 
           देशा सह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मागिल 21 दिवसा पासून लॉक डाऊन सुरू आहे. 
कोरोना या जागतिक महा संकटापासून सुटका करून घेण्याचे सर्व नियम केंद्र व राज्य सरकारने तयार केले आहेत. याचे पालन सर्वांनी करावेत. याचा परिणामी कोरोनामुळे 'कष्टकरी' कामगारांवर लॉकडाऊन चे 'मोठे' आर्थिक संकट निर्माण झाले आहे. देशातील महाराष्ट्रात अनेक रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकार सर्वेतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतु या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी खूप मोठे आव्हान आपल्या समोर आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने एक परिपत्रक काढून सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. पहिला ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला आहे. असे केंद्रीय उच्च शिक्षण मंत्री यांनी घोषणा केली आहे. तसेच कोरोनाच्या" पार्श्वभूमीवर दहावीचा भूगोलचा पेपर  रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तर नववी आणि अकरावीचा पेपर होणार नाही. असा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात पदवी व पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करावे. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात यावे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गर्दीत टाळण्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी गित्ते यांनी केली आहे. 
            कोरोना विषाणूचा संसर्ग जगभर थैमान घालत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मा. प्रधानमंत्री यांनी देशभर 21 दिवसांचा लाॅकडाऊन केला आहे. 
राज्यात या विषाणूचा संसर्ग वाढू नये. याकरिता मा. मुख्यमंत्री विविध महत्वपूर्ण निर्णय घेत आहे. प्रशासन आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी या निर्णयांची प्रभावीपणे  अंमलबजावणी करीत आहे. याच पार्श्वभूमीवर पदवी व पदव्युत्तर परिक्षा असून बी.ए.बी.काँम, बी.एस.स्सी, एम.ए. व एम.एस्सी या परिक्षेसाठी हजारों विद्यार्थी बसतात 
तसेच मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी परिक्षा घेतल्या जातात 17 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान परिक्षा होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.  तरी प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता बाळगण्यासाठी या होणाऱ्या परिक्षा रद्द करून पुढील वर्गात प्रवेश घावा, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे व विविध ठिकाणीहुन विद्यार्थी परिक्षासाठी दाखल होतात. तरी विद्यार्थ्यांनी गर्दीत टाळण्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही तो पर्यंत परीक्षांच्या न घेता सरासरी गुण देऊन. पुढील वर्गात प्रवेश घा, कोरोनाच्या संकट काळात राज्यातील पदवी व पदव्युत्तर विभागाच्या परीक्षा पुढे ढकलून सर्व विद्यार्थींना पुढे वर्गात प्रेवेशित करावे अशी मागणी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबनभाऊ गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव गित्ते यांनी  मुख्यमंत्री यांच्यासह राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय मंत्री व पालकमंत्री धनंजय मुंडे, विभागीय आयुक्त औरंगाबाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या कडे ईमेल व्दारे केली आहे.

No comments:

Post a Comment