तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 April 2020

परळी येथे फळे व भाजीपाला विक्री करणाऱ्या फिरत्या परवानाधारक वाहनाचे उद्घाटनजिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचनेनुसार शेतकरी ते ग्राहक थेट विक्री ही संकल्पना परळीत राबविण्यास सुरुवात 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   दि. १४ नागरिकांना फळे व भाजीपाला सुरळीत पुरवठा करण्यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री ही संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात येत असून याची सुरुवात परळी येथे फळे व भाजीपाला विक्री करणाऱ्या परवानाधारक वाहनाचे उद्घाटन तहसीलदार बिपीन पाटिल, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर,न.प.मुख्यधिकारी अरविंद मुंडे,तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवने , आत्मा प्रमुख कविता फड, यांच्या हस्ते करण्यात आले.

       शेतकरी ते ग्राहक थेट विक्री ची संकल्पना राबवत फळे व भाजीपाला याचा सुरळीत पुरवठा होण्याकरिता कृषी विभागाकडे  नोंदणी करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी संघ, शेतकरी गट यांना रात घरोघरी फिरून फळे व भाजीपाला विक्रीचा परवाना व वाहन परवाना देण्यात आला आहे. शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी संघ यांना दिलेल्या परवाना नुसार सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नेमून दिलेल्या विभागात फिरून भाजीपाला विक्री करण्यात येणार आहे.

No comments:

Post a comment