तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 April 2020

अंगनवाडीमधील बालकांचे पोषण आहाराचे धान्य गेले कुठे?


लाॅकडाऊनच्या काळात गरीब मुलाच्या मुखातला घास हिरावला

अंगणवाडीतील बालकांना घरपोच शिधा द्यावा

वाशिम(फुलचंद भगत)-कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सगळीकडे संचारबंदी लागु केली,कोरोनाचा प्रकोपही पाहावयास मीळत आहे अशातच सर्व शाळा अंगनवाड्याही बंद करन्यात आल्या परंतु शाळेमधील शिल्लक धान्य लाॅकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना मीळावे म्हणून सोशल डिसटंस ठेवुन वाटपही करन्यात आला मग अंगणवाडीतील बालकांबाबतच दुजाभाव का असा प्रश्न ऊपस्थीत करत अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणारे पोषण धान्य ताबडतोब वाटप करा तसेच तिन ते सहा वयोगटातील अंगनवाडितील बालकांना दिल्या जात असतेले ताजे व गरम आहार न देता त्यांचे घरपोच पोषण आहाराचा शिधा वाटप करा अशी मागणी समाजसेविका ज्योती ठाकरे यांनी प्रसिध्दी पञकाव्दारे प्रशासनाकडे केली आहे.अंगणवाडीत दिल्या जात असलेले पोषण आहाराचे धान्य बर्‍याच बालकांना दिले जात नव्हते,काहींना कमी तर काहिंना जास्त अशाप्रमानात वाटप होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या होत्या त्यामुळे त्याविषयी आवाज ऊठवत गरीबांच्या मुलाच्या मुखातील घास का हिरावता याविषयी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनीही काही दिवसापुर्वी प्रशासनाकडे केली होती त्यानुसार सबंधित अधिकारी खडबडुन जागे होवुन त्यांनी चौकशीही केली त्यानंतर सुरळीत पुरवठा सुरु झाला परंतु पुन्हा तसाच गलथान कारभार अंगनवाड्यामध्ये दिसत असल्याने प्रशासनाने लक्ष देन्याची गरज निर्माण झाली आहे.गोरगरीबांचा हक्काचा घास हिरावुन घेणार्‍यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment