तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 April 2020

नाभिक कारागीरांना एक महिनापुरेल येवढे किराणा सामान दिले ; मदत करणाराने मदतीचा ना, काढला फोटो, ना, केली नांवाची प्रसिध्दी



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी शहरातील नाभिक कारागीर कोरोना लाँकडाऊनमुळे बेरोजगार झाले अशा काही जणानां एका गुप्तदात्याने महिनाभर पुरेल इतका प्रत्येकी 1425रू.किमतीचा किराणा माल वाटप केला आहे.हि मदत करतांना या  दात्याने ना फोटो काढला,ना मदतीची स्वताची प्रसिध्दीची बातमी काढली हे विशेष म्हणावे लागेल
  शहरातील  नाभिक  कारागीर  यांची  लाॅकडाऊनचया  काळात  उपासमार होऊ नये म्हणून  एका  दानशूर  व्यक्तीने आपल्या ऐपती प्रमाणे फुल ना फुलाची पाकळी म्हणुन सुमारे  वीस  कारागीरांना  एक महिना पुरेल इतके रेशन  दिले.
  सद्या अनेक जणांचा लोकांना  मदत  कमी अन फोटो आणि  प्रसिद्धी  जास्त करण्याकडे कल वाढत आहे अशा प्रसिध्दीलोलुप  लोकांपुढे या  दानशूर  व्यक्तीने उत्तम आदर्श  घालून  दिला
असुन ज्यांना मदत मिळाली त्यांनी अशा निस्वार्थी मदत करणारांचे मनापासुन आभार व्यक्त केले आहे.

No comments:

Post a comment