तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 April 2020

कोरोनामुळे साखरा येथील फोटो व व्हिडिओग्राफरवर लॉकडाऊन चे 'मोठे' आर्थिक संकट

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

 देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशा बिकट परिस्थिती व कोरोनामुळे फोटो व व्हिडिओग्राफरवर लॉकडाऊन चे 'मोठे' आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शासनाने त्यांच्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे व्यवसाय धारकांनी केले आहे.
      जगात कोरानाच्या विषाणुचा थैमान घातले आहे. कोरोनाचे संकट हे वेगवेगळ्या स्वरूपात अनेक लोकांना जाणवत आहे, फक्त कोरोना बाधितच याला अपवाद नसून या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने "लोकडाऊन" जाहीर केल्यानंलहान मोठे व्यावसायिकाना आर्थीक संकटाचा सामना करावा लागत आहे.  राज्यातील विविध सार्वजनिक, वैयक्तिक व सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी करून आपला व आपल्या कुटुंबाचा चरित्रार्थ चालवणाऱ्या लोकांवर मात्र बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून ऐन हंगामात त्यांना आर्थिक प्राप्तीसाठी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे.
            कोरानाच्या लाॅकडाऊनमुळे रोजच्या रोज कष्टातून मिळणाऱ्या रोजगाराचा अर्थात पोटापाण्याचा प्रश्न ऊभा राहिला आहे. कोरोनाचे संकट आल्यामुळे कुटुंबाचे पोट कसे भरावे ,हा मोठा प्रश्न या ऊभा असणार आहे. तेंव्हा या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व शासन पातळीवरील नेतृत्वाने हातावर पोट भरणाऱ्या कष्टकरी बांधवांच्या पाठिशी उभे रहावे आणि यथायोग्य अर्थसहाय्य करावे अशी अशी मागणी व्यवसाय धारक विकास गोरे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया

सध्या देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे अशा बिकट परिस्थिती वर कोरोनामुळे आमच्या फोटो व व्हिडीओग्राफरवर मोठे आर्थिक नुकसान निर्माण जाले आहे शासनाने आमच्या परिस्थितीकडे लक्ष देण्याची गरज आहें

विकास गोरे साखरा पोठोग्राफरतेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment