तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 April 2020

पोत्रा,सिंदगी येथे भूकंपाचे धक्के भिंतींना गेले तडे ; खासदार हेमंत पाटील यांनी दिली घटनास्थळी भेट

----------------------------------------------
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील पोत्रा व सिंदगी येथे भूकंपाचे आज (दि.26 ) सकाळी आठ सुमारास भूकंपाचे धक्के बसल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असता जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना दिलासा दिला.
              मागील काही  महिन्यापुर्वी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ,कळमनुरी, बाळापूर भागात भूकंपाचे  सौम्य व तीव्र स्वरूपाचे धक्के बसले होते त्यानंतर मागील दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री व  दुपारच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील पोत्रा व सिंदगी येथे भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते यावेळी कोणाच्याही लक्षात ही बाब आली नव्हती परंतु आज (दि.26 ) सकाळी आठच्या सुमारास याच भागात भूकंपाचा धक्का बसल्याने या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. ही बाब जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील यांनी  तात्काळ घटनास्थळी भेट देऊन त्या भागाची पाहणी केली असता घरांना भेगा पडल्याचे निदर्शनास आले.आधीच कोरोना आजाराच्या  संसर्गाने नागिरक मागील एक महिन्यापासून भयभीत होऊन  लॉकडाऊनमुळे घरात बसून आहेत  त्यामध्ये भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिक भयभीत झाले होते.खासदार हेमंत पाटील यांनी भेट देऊन नागरिकांशी सवांद साधला व म्हणाले की, हा धक्का खूप सौम्य असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये .यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत दक्ष राहून कार्य करण्याच्या सूचना केल्या.यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोत्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन त्याठिकाणच्या सोयीसुविधा कोरोनाच्या  अनुषंगाने करण्यात घेण्यात आलेल्या उपाय योजनेची माहिती घेतली यावेळी  वसमत चे नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार, जि.प. सदस्य राजू चापके, बालाजी देवकर ,माजी जि.प.सदस्य रवी नादरे,  प.स.सदस्य संजय मंदाडे,सोमनाथ रणखांब, रमेश साळुंखे, संभाजी सिद्धेवार ,विद्याधर मगर, रामराव मगर, संतोष मगर, प्रभाकर कंधारे, प्रतापराव मगर,ज्ञानेश्वर मगर, बाळू मगर ,अशोक मगर, मारोतराव देशमुख, माधव नगर, बाळासाहेब खंदारे, विजय मुलगीर, रघुनाथ मुलगीर, शंकर मुलगीर, सरपंच सोपान रणवीर, शिवदास अप्पा, जानकीराम अप्पा ,शंकर पाटील सुधाकर भारती सह आदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment