तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 10 April 2020

परळीत दोन तलाठी निलंबित ; उपजिल्हाधिकारी यांची कारवाईपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळीत कोरोना विषाणु संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अंमलबजावणी बाबत व कोरोना सारखी नैसर्गिक आपत्ती असताना हे तलाठी गैरहजर राहून कुठल्याही प्रकारचे गांभीर्य नसल्यामुळे आज शुक्रवार रोजी उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक यांनी दोन तलाठी सेवेतून निलंबित केले आहेत. सज्जा नागपिंप्रीचे मोतिराम गुंडेराव जिलेवाड,तर पिंपळा गाढे या सज्जाचे सचिन सुधीर एंरडे यांना निलंबित करण्यात आहे  हे दोघे सदर कामी हलगर्जीपणा,वरिष्टांच्या आदेशाची अवहेलना व कर्तव्यात कसुर व कोरोना सारखी नैसर्गिक आपत्ती असताना हे तलाठी गैरहजर राहून निष्काळजीपणा केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

No comments:

Post a comment