तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

ज्ञानदिप लावुन महात्मा फुले जयंती साजरी करा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समता परिषदेचं आवाहन..

महात्मा फुले जयंतीला प्रत्येकाने आपापल्या घरीच सुरक्षित राहुन रात्री ८ वाजता महात्मा फुलेंच्या प्रतिमेस हार अर्पण करुन त्यांच्या साहित्याचे वाचन करुन अभिवादन करावे, असं आवाहन अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष चक्रधर उगले यांनी केलं आहे.

११ एप्रिल रोजी महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही जयंती प्रतिवर्षाप्रमाणे विविध उपक्रमांद्वारे आपल्याला साजरी करता येणार नाही.

त्यामुळे सर्वांनी आपापल्या घरीच रात्री ८ वाजता दीपप्रज्वलन करुन महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. त्यानंतर महात्मा फुले यांच्या अजरामर सत्यशोधक साहित्याचं वाचन करुन जयंती साजरी करावी, असं आवाहन परभणी जिल्हा अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.

या दिवशी रस्त्यावर न येता आपापल्या घराच्या उंबरठ्यातच ज्ञानाचे ११ दिवे लावून या महापुरुषाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करून अभिवादन करावं.

"घरी रहा, सुरक्षित रहा आणि कोरोनाला हरवा" असं आवाहन यानिमित्ताने चक्रधर उगले व समता परिषदेचे जिल्हा पदाधिकारी व समता सैनिकांच्या वतीने करण्यात आलं आहे.

No comments:

Post a comment