तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 26 April 2020

बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पेपर लाईन करणाऱ्या मुलांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप


बीड (प्रतिनिधी) :- 
अक्षयतृतीयाचे शुभमुहूर्त साधून कोरोना सारख्या महामारीत देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य जनतेला घरोघर जाऊन वृत्तपत्र वाटप करणाऱ्या कष्टकरी गरजवंत 21 मुलांना पत्रकार संघाच्या वतीने जीवनावश्यक साहित्यांचे कीट देऊन सन्मानित करण्यात आले.
 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश संघटक संजय भोकरेसर, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, मार्गदर्शक संतोष मानूरकर यांच्या सूचनेवरून बीड जिल्हा शाखेच्या वतीने रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांच्या निवासस्थानी सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करून 21 पेपर लाईन करणाऱ्या मुलांना जीवनावश्यक किराणा साहित्यांसह भाजीपाला वाटप करण्यात आला.
कोरोना महामारीने संपूर्ण जग ठप्प झाले आहे.या परिस्थितीचा गंभीर परिणाम इतर क्षेत्राप्रमाणे वृत्तपत्र सृष्टीवर देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.पेपर वाटप करून कुटुंब चालवणारी संख्या शेकडोंच्या घरात आहे. आज आज पेपर वाटप करणाऱ्या मुलांवर उपासमारीची वेळ येऊ लागली आहे.त्यामुळे अशा महामारीत सुद्धा ही मुले आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य जनतेला जगात चाललेल्या घडामोडींची माहिती घरबसल्या कळावी यासाठी प्रसिद्ध झालेले वृत्तपत्र घरोघर जाऊन नित्यनेमाने आजही वाटप करत आहेत.अशा बहाद्दर आणि कष्टकरी पेपर वाटप करणाऱ्या 21 मुलांना जीवनावश्यक किराणा साहित्यासह भाजीपाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ बीड जिल्हा शाखेच्या वतीने वाटप करण्यात आला.

No comments:

Post a Comment