तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 April 2020

आईच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यार्थ्यांना सरंक्षण किटचे वाटपवाशिम(फुलचंद भगत)-जिल्ह्यातील काजळांबा येथील स्काउट शिक्षकाने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हा परिषद शाळेतील वर्ग १ते७च्या विद्यार्थ्यांना 'कोरोना संरक्षक' साहित्याचे घरपोच जावुन वाटप करण्यात आले.
काजळांबा येथील  पदवीधर शिक्षक तथा  स्काउट मास्टर विनोद राजगुरू यांनी स्तुत्य उपक्रम राबवुन विद्यार्थ्यांना कोरोनापासुन स्वरंक्षणाचा धडा दिला.
या संरक्षक किट मध्ये त्यांनी १मास्क, साबण,कोरोना प्रतिबंधासाठी जागृती पत्रक इ. साहित्य होते.शाळेतील शिक्षक,स्काउट गाईड पथकातील विद्यार्थी यांचे गट करून गावात घरोघरी जाऊन शाळेत दाखल २२१विद्यार्थी,९शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य व ग्राम पंचायत सदस्य यांना 'सोशल डिस्टन'ठेवून या साहित्याचे वाटप करण्यात आले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment