तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 12 April 2020

"मदत नव्हॆ कर्तव्य..!"ज्योती ठाकरे देणार गरजु महिलांना मदतीचा हाथलाॅकडाऊनच्या पार्श्वभुमीवर महिला टिम अॅक्शनमोडवर

गरजु महिलांनी संपर्क करन्याचे आवाहन

वाशिम:-(फुलचंद भगत)-कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लाॅकडाउनचा कालावधी वाढवन्यात आल्याने गरीबांना ऊदरनिर्वाहासाठी मोठा सामना करावा लागणार आहे.शासन सर्वतोपरी मदत करीतच आहे तरीही मंगरुळपीर तालुक्यातील महिलांना या कालावधित अडचन निर्माण झाल्यास सबंधित प्रशासनाची पुर्वपरवानगी घेवुन आणी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आवश्यक काळजी घेवुन व शासनाच्या नियमाच्या आधीन राहुन समाजसेविका ज्योतीताई ठाकरे आणी त्यांची महिला टिम ही मदत पोहचवणार आहेत.त्यामुळे गरजुंनी मदतीसाठी संपर्क करन्याचे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.
           सध्या संपूर्ण देशात कोरोनाचे संकट घोंगावत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन केलेले आहे. लॉकडाऊन असल्या मुळे सर्वसामान्यांच्या पुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्वसामान्य गरजु कुटुंबांना मदत व्हावी, सामाजिक बांधिलकी, माणुसकीचे नाते टिकावे या सेवाभावी वृत्तीने 'मदत नव्‍हे कर्तव्य' या उपक्रमाअंतर्गत समाजसेविका ज्योती ठाकरे आणी त्यांची महिला टिम सदैव मदतीसाठी तत्पर असतात यापुढेही सहकार्य करणार असे मत व्यक्त केले. जीवनावश्यक वस्तूंचा संच १एप्रिल रोजी मंगरुळपीर शहरातील गरीब कुटुंबांना व गरजूंना देण्यात आला. या लॉकडाऊन काळात कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी  प्रयत्नशील आहोत असे ज्योती ठाकरे यांनी सांगीतले. तसेच प्रत्येक गरजु व्यक्तीपर्यंत संच पोहोचवण्याची जबाबदारी माझ्या सहकारी महिला,बचत गटातील सहकारी महिला यांनी घेतली असल्याचे त्या म्हणाल्या.या लाॅकडाउन काळात गरजु महिलांनी मदतीसाठी संपर्क करावा असे आवाहनही करन्यात आले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206/9763007835

No comments:

Post a comment