तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 10 April 2020

सोनपेठ येथे आ. सुरेश वरपुडकर यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप

प्रतिनिधी
सोनपेठ:- येथे आज कोविड-१९ व लॉकडाउन मुळे शहर व तालुक्यातील गरजू व निराधार लोकांना  जीवनावश्यक वस्तू च्या एक हजार किट वाटपाची सुरुवात पाथरीचे आ सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सोनपेठ चे उपनगराध्यक्ष दत्तात्रेय कदम, सहाय्यक निबंध पी एस राठोड तहसीलदार घोडके, मुख्याधिकारी सोनम देशमुख, गटविकास अधिकारी  खुडे, पी आय गजानन  भातलवंडे , तालुका आरोग्य अधिकारी सुभाष पवार , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा डॉ मुंजाभाऊ धोंडगे, शहराध्यक्ष राजू सौदागर, राजकुमार आंबुरे, शुभम कदम, जगन्नाथ कोणते, शेख जावेद , प्रभाकर शिरसाट, बाळासाहेब शिंदे, बंडू गिरी, संतोष परांडे मदन चव्हाण, समीर उद्दिन काझी, गौस कुरेशी इत्यादी हजर होते यावेळी शहर व तालुक्यातील गरजूंना सामाजिक अंतर ठेवून जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

No comments:

Post a comment