तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 12 April 2020

प्रतिष्ठीत व्यापारी गौतमचंद कोटेचा यांचे निधन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
    शहरातील जुन्या पिढीचे प्रसिद्ध भुसार व्यापारी गौतमचंद कोटेचा यांचे दीर्घ आजाराने आज (रविवारी) सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 85 वर्षे होते. 
       शहरातील पद्मावती गल्लीतील रहिवाशी  प्रतिष्ठीत व्यापारी गौतमचंद कोटेचा हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यातच आज रविवार दि. 12 एप्रिल 2020 रोजी सकाळी 8.15 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर सकाळी 11 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. स्व. गौतमचंद कोटेचा यांच्या पश्चात सुनील आणि महावीर अशी दोन मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
      स्व. कोटेचा हे नामांकित व्यापारी म्हणून आणि मनमिळाऊ व धार्मिक वृतीसाठी ओळखले जात असत. कोटेचा परिवारावर कोसळलेल्या दुःखात तेजन्युज. हेडलाईन्स परिवार सहभागी आहे.

No comments:

Post a comment