तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 8 April 2020

बीड जिल्ह्यात कोरोनाचा रूग्ण आढळला ; कोरोना विषाणू संसर्ग झालेला रुग्ण आढळल्याने पिंपळा गावापासून तीन किलोमीटर परिसर कंटेनमेंट झोन (containment zone) म्हणून घोषित



बीड (प्रतिनिधी) :- 
आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळून आला आहे इतर ठिकाणी याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी फौजदारी दंड संहिता 1973 कलम 144 नुसार पिंपळा गावापासून तीन किलोमीटर परिसर यामध्ये सुंबेवाडी ,धनगरवाडी ,काकडवाडी ,ढोबळ सांगवी व खरड गव्हाण हा परिसर कंटेनमेंट झोन (containment zone) म्हणून घोषित केला आहे . 
      याचा नंतरचा पुढील चार किलोमीटर चा परिसर लोणी , नांदूर , सोलापूरवाडी , खुंटेफळ कोयाळ हे गावे बफर झोन (buffer zone) म्हणून घोषित करण्यात येत आहे . वरील सर्व गावे व परिसर पुढील अनिश्चित काळासाठी पूर्ण वेळ बंद करण्यात येत असून संचारबंदी लागू केली आहे.

No comments:

Post a Comment