तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 23 April 2020

रमजान, मधुमेह, COVID_19 कोरोना


सुभाष मुळे..
----------------
सध्या संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे सावट पसरलेले आहे, भारतात देखील याचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात आहे, सध्या प्रशासनाने जे लॉकडाऊन चालू केलेले आहे ते याचा प्रसार रोखण्यासाठीच आहे याची जाणीव असायला हवी.
           आता रमजान या पवित्र महिन्याची सुरुवात होत आहे. या संपूर्ण काळात सर्व मुस्लिम बांधव उपवास धरतात.त्यात पहाटेपासुन तर सुर्यास्तापर्यन्त काहीही ग्रहण केले जात नाही, माञ ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसारखे आजार आहेत, त्यांनी या प्रकारचे उपवास शक्यतो धरुच नयेत, कारण कोणत्याही विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आपले आरोग्य चांगले असणे, आपली रोग प्रतिकार क्षमता चांगली असणे आवश्यक आहे. वेळेवर जेवण करणे, पोषणयुक्त आहार घेणे, रात्री ७- ८  तासाची योग्य झोप घेणे, भरपूर प्रमाणात पाणी पिणे, यामुळे आपली रोग प्रतिकार क्षमता चांगली होण्यास मदत होते. त्यामुळेच या काळात मुस्लिम बांधवांनी ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसारखे आजार आहेत, त्यांनी उपवास करूच नयेत तसेच सध्या उन्हाळा असल्या कारणाने लवकर डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपली रोग प्रतिकार क्षमता अजून कमकुवत होते, या सर्व गोष्टी टाळण्यासाठी या वर्षी उपवास न करणे हेच योग्य आहे.

उपवास कोणी करावा
---------------------------
ज्या कोणाला उपवास करायचे आहे, त्यातील मधुमेही व्यक्तींनी आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण  तपासून घ्यावे, आपली HbA1c ही तपासणी करून घ्यावी, या HbA1c तपासणीने रुग्णाची मागच्या ३ महिन्यापासून साखर किती प्रमाणात आहे हे आपणास कळते, जर तुमची HbA1c ७ %  च्या आत असले तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या मेडिसिन मध्ये तसेच जे कोणी इन्सुलिन घेतात त्यांच्या इन्सुलिनच्या डोस मध्ये आवश्यक ते बदल करून, ते रुग्ण उपवास करू शकतात.

उपवास कोणी करू नये
-----------------------------
६० वर्षावरील वयोवृद्ध, गरोदर महिला, अनियंत्रित साखरेचे प्रमाण असणारे रुग्ण, ज्यांना आधीच श्वसना संदर्भातील आजार आहे, TB  रुग्ण, टाईप 1 प्रकारचा मधुमेह असणारे रुग्ण, ज्यांचा रक्तदाब प्रमाणात नाही व ज्यांना रक्तदाबसाठी एक पेक्षा अधिक मेडिसिन चालू आहेत त्यांनी देखील रमजान चे उपवास करणे टाळावे.

उपवास करणाऱ्या मधुमेही
व्यक्तींनी घ्यावयाची काळजी
-----------------------------------
१. सर्वप्रथम म्हणजे या वर्षी रमजान हे ऐन उन्हाळ्यात असल्याने सर्वात महत्त्वाचे आहे शरिरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे.
२. त्यामुळे प्रत्येकाने उपवास सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे पर्यन्त ३-३.५ lit.पाण्याचे सेवन करावे,जेणेकरुन उपवासाच्या काळात शरिरात पाण्याची कमतरता भासणार नाही.
३. इफ्तार नंतर जेवणाचा वेग हा मंद ठेवावा. घाई घाई जेवण करु नये..
४. इफ्तार ची सुरुवात ही भरपुर पाणी पिऊन करावी, सोबतच १-२ खारीक( खजुर ऐवजी खारीक diabetes मधुमेह pt साठी उपयुक्त ) व कोणतेही एखादे फळ घ्यावे.(सफरचंद, संञी, मोसंबी अथवा टरबुजची एक फोड).
५. इफ्तारच्या वेळी चुकुनही तळलेले भजे, अथवा कबाब यांचे सेवन diabetes, high BP,  high cholesterol patients ने करु नये.
६. मटणच्या ऐवजी चिकन, मासे यांचे सेवन करावे. इफ्तार ते सेहर कालावधीत सुकामेवा घेवु शकता, त्यात खारिक, पिस्ता, अक्रोड यांचेच सेवन करावे.

Ramadan meal plan
--------------------------------
सहेर (पहिले जेवन) - १ ताजे फळ, मुठभर सुकामेवा, ज्वारी भाकरी/गव्हाची पोळी+ १ वाटी भाजी. किंवा रोटी+ दुध, किंवा पराठा ( मेथी, पालक, कोबी ) + दही....                     
फजर पुर्वी-  १ वाटी उपमा..          
-----------------------------------
दूसरे जेवण ( इफ्तार) - १ ताजे फळ ( सफरचंद, संञी, मोसंबी, १ फोड टरबुज/पपई ).. १ ग्लासभर निंबु पाणी/ लस्सी ( साखरे शिवाय ), २ - ३  खजुर....                                  

तिसरे  जेवण ( post magrib ) -  शेवयांची खिचडी ( त्यात सर्व भाज्या टाकाव्यात )  किंवा दलिया किंवा रोटी + भाजी+ भात ..... यातही तुम्ही plain भाताऐवजी सर्व प्रकारच्या भाज्या टाकुन केलेला पुलाव + रायता.

चौथे जेवण ( राञी झोपताना) -  लस्सी / १ ग्लास दुध. ( विना साय , विना साखर )

            उपवास व्यतिरिक्त संपुर्ण काळात थोड्या थोड्या वेळाने पाणी पित रहावे. जेवताना green salad भरपुर घ्या, त्यात fibre चे प्रमाण अधिक असते, जेणे करुन आहाराचे पचन योग्यरित्या होते. सोबतच आपल्या diabetologist डॉक्टर कडुन oral medications बद्दल योग्य माहिती घ्यावी.                      

७. साखर कमी होण्याचे / जास्त होण्याचे लक्षणे यांच्याकडे लक्ष द्यावे, तसे आढळल्यास तात्काळ उपवास सोडावा व आपल्या डाँक्टर शी संपर्क करावा....                

८. या कालावधीत जास्त कष्टाची कामे करु नयेत. उन्हात जाताना स्कार्फचा, टोपीचा वापर करावा. आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण आवश्यक तेव्हा लगेच तपासुन घ्यावे.

९. आवश्यक असेल त्याच वेळेला घराबाहेर पडा, बाहेर जाताना तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधून जावे, तसेच बाहेरून आल्यानंतर लगेच स्वच्छ अंघोळ करावी.

१०. दिवसातून १० ते १२ वेळा साबणाने स्वच्छ हात धुवावे. आपल्या नाकाला, तोंडाला, डोळ्यांना सारखा स्पर्श करू नये.    

सर्वांना हा महिना  स्वस्थ आरोग्यपुर्ण  जावो..

--------------------------
डॉ. वर्षा धनंजय माने
माने हॉस्पिटल & डायबेटीस केयर युनिट
--------------------------------------------------

╭══════════════╮
   🖋 सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
╰══════════════╯

1 comment: