तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 22 May 2020

महादेव ईटके यांनी वाढदिवसानिमित्त 100 गरजूं कुटुंबाला कोरोनाच्या संकटात दिला आधार


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  भाजपा माजी नगरसेवक महादेव ईटके यांच्याकडून लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या 100 वासुदेव ,विधवा महिला कामगार व मुस्लिम समाज साठी शिरकूर्म साहित्य गरजू कुटूंबियांना जीवनावश्यक वस्तूंसह दैनंदिन गरजेच्या किटचे वाटप करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दोन टप्प्यात मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ होता. परंतु, तिसऱ्या टप्प्यात ओघ ओसरत असताना चौथ्या टप्यात महादेव ईटके यांच्या मदतीमुळे गरजू कुटूंबियांना मोठा दिलासा मिळला आहे.

कोरोनाच्या संकटाशी संपुर्ण राज्य लढा देत असतांना हातावर पोट असणाऱ्या गोरगरिब गरजूंसाठी अन्नधान्य आणि दैनंदिन गरजेच्या दोन महिनाभर पुरतील एवढ्या वस्तू पुरवत ईटके यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.या वेळी जेस्ट नेते दत्तापा ईटके दयानंद स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ सचिव प्रभाकर अप्पा ईटके मदन इंगळे सर आदी उपस्थित होते कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून कामगार, मजूर, सामान्य कुटूंब घरामध्ये बसून आहेत.
हाताला काम नाही अन पोट हातावरचे अशा परिस्थितीत या कुटूंबियांसमोर संकटाचा डोंगर उभा राहिला आहे.

प्रत्येक जण एकमेकाला या कठीण परिस्थितीमध्ये मदतीचा आधार देत होता. गेली 60 दिवस या मदतीवरच हजारो कुटूंब आपला उदरनिर्वाह भागवत होते. मात्र पुन्हा लॉकडाऊन वाढल्याने आता काय खायचे? असा प्रश्न निर्माण झाला. आतापर्यंत अनेक सामाजिक संस्था, संघटना राजकीय पक्ष, नेते, लोकप्रतिनिधींनी गरीबांना मदतीचा हात देत त्यांची काळजी वाहिली

No comments:

Post a comment