तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 31 May 2020

माजलगाव कोरोना मुक्त कोरोनाची लागण झालेल्या 13 रुग्णाला दिली सुट्टी


माजलगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेला माजलगाव तालुका आज कोरोनामुक्त झाला आहे. कोरोनामुक्त झालेल्या 9 महिला तर 4 पुरुष असे 13 रुग्णांना आज (दि.31) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. या रुग्णांना बॅन्ड वाजवत आणि फुलांचा वर्षाव करत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आ.प्रकाश सोळंके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, सभापती अशोक डक,  ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुरेश साबळे यांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करत बॅन्ड वाद्यासह स्वगृही पाठविण्यात आले.
   माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे मुंबईवरुन आलेल्या 13 जणांना कोरोनाची लागण झाली होती. एकाच दिवशी 13 रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. सदरील रुग्णावर माजलगाव येथील मुलींचे शासकीय वस्तीगृहातील क्वारंटान सेंटरवरच आरोग्य विभागाच्यावतीने उपचार करण्यात आले. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.गजानन रुद्रवार, डॉ.प्रकाश कुलकर्णी यांच्यासह कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. सर्वच रुग्णास आपआपल्या घरी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत स्वगृही पोवचविले. यावेळी डॉ.गजानन रुद्रवार, डॉ.प्रकाश कुलकर्णी, डॉ.एस.पी. गुंजकर, डॉ.सतेंद्र दबडगावकर यांच्यासह आरोग्य विभागातील नर्स आदी उपस्थिती होती. सर्वच रुग्णांला पुन्हा होम क्वारंटाईन राहण्याच्या सुचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. माजलगाव तालुका कोरोनामुक्त झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

No comments:

Post a comment