तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 May 2020

परळीतील परराज्यातील 170 मजुर सात बस ने रवाना


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
 परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्र,सिमेंट फॅक्टरी व इतर ठिकाणी काम करणार्या परळी व परिसरातील 170 परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.या मजुरांसाठी परळी आगारातुन सात बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.
 परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्र सिमेंट फॅक्टरी येथे काम करणारे व परिसरातील इतर ठिकाणी उत्तर प्रदेश,बिहार,मध्य प्रदेश या राज्यातील शेकडो कामगार काम करतात.मागील दोन महिन्यापासून कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे या मजुरावर उपासमारीची वेळ आली होती.केंद्र व राज्य सरकारने परराज्यातील मजुरांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी देवुन विशेष रेल्वे सुरु केल्यानंतर परळी व परिसरातील 170 परप्रांतीय मजुरांनी याची नोंदणी केल्यानंतर त्यांना औरंगाबाद रेल्वे स्थानकापर्यत एस.टी.महामंडळाच्या बसेस ने सोडण्यात आले.परळीचे तहसीलदार विपीन पाटिल,नायब तहसीलदार बाबुराव रुपनर,आगारप्रमुख राजपूत,तलाठी विष्णु गित्ते आदींनी सोशल डिस्टन्स पाळत या मजुरांची सात बसेसद्वारे रवानगी केली.

No comments:

Post a Comment