तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 May 2020

परळी तालुक्यातील 18 स्वँब निगेटिव्ह ; कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील 18 जणांचे अहवाल निगेटिव्ह, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
परळी तालुक्यातील नाथरा येथील कोवीड-19 चे  18 संशयीत रुग्णाचे सोमवारी परळी उपजिल्हा रुग्णालया मार्फत स्वॕब घेण्यात आले होते.त्या स्वॕबचा आज पहाटे अहवाल प्राप्त झाला असुन ते 18 ही संशयीतांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ दिनेश कुरमे यांनी दिली.
यारिपोर्टकडे  परळी तालुक्यातील सा-यांचे लक्ष  वेधून घेतले होते काही जणांनी तर अक्षरशा राञ जागुन काढली होती.
नाथरा येथील 18 नागरिक गेल्या काही दिवसा पूर्वी शेळगाव येथील एका कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आल्याने त्या अठरा नागरिकांची खबरदारी म्हणून आरोग्य प्रशासनाने सोमवारी त्यांच्या त्यांच्या स्वॕबचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले होते. 48 तास होऊन गेले तरीही त्या अठरा जणांचे रिपोर्टचा अहवाल प्राप्त होण्यास विलंब का लागतोय नक्कीच धोक्याची घंटा आहे.त्यामुळेच वेळ लागतोय अश्या अनेक गोष्टींनी धासती वाढवली होती.परळीकरांनच नशिब बलोत्तर की काय आज आखेर सकाळी त्या अठरा नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह  आल्याने परळीकरांचा जीव भांड्यात पडला आहे.आता केवळ परळीतुन पाठवलेल्या चार जणांच्या रिपोर्टची प्रतिक्षा आहे.घरीच रहा सुरक्षित रहा,कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment