तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 May 2020

धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लिंबोटा येथे 200 गरजूवंत कुटुंबाना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करून दिला मदतीचा हात- गोविंद कराडपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूमुळे सर्वत्र नागरिक हैराण झाले आहेत. लाँकडाऊन मध्ये अडकलेल्या व हातावर पोट असणाऱ्या गरजुवंत नागरिकांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून 200 गरजुवंत कुटुंबांना जीवनाश्यक वस्तुंचे सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करत वाटप करण्यात आले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनामुळे ओढवलेल्या संकटात गरजूंना मदतीचा हात दिल्याने आधार मिळाला आहे.  पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी नेहमीच गोरगरीबांच्या मदतीला धावून येणारे नेतृत्व असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष गोविंद कराड यांनी सांगितले.
           देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनामुळे लॉकडाऊनची स्थिती आहे. काही जीवनावश्यक गोष्टी सोडल्या तर बाकी सगळंच बंद आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हाच एक उपाय आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन आहे, हातावर पोट असणारे, रोजंदारी, कष्टकरी कामगार व गोरगरीब जनता यामुळे मोठ्या अडचणीत सापडली आहे, त्यांचा रोजगार बंद झाला आहे.त्यामुळे हातावरचे पोट असणार्‍या मजुरांना जगणे मुश्कील झाले आहे.हाताला काम नाही त्यामुळे मिळकत कुठुन अशात कुटुंबांचा ऊदरनीर्वाह तरी कसा करायचा असा एक प्रश्न गरीबांसमोर ऊभा झाल्याने  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे व गटनेते वाल्मिक (अण्णा) कराड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष गोविंद कराड यांनी धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून गोरगरीबांना जिवनावश्यक वस्तुचे वितरण करुन गरीबांना आधार दिला आहे. परळी तालुक्यातील लिंबोटा व लिंबोटा तांडा येथील 200 गरजुवंत कुटुंबांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये गव्हु, तांदूळ, तुर दाळ, साखर, गोडतेल, चना, मीठ पुडा, मिरची व हळद पावडर, साबण आदी देण्यात आले आहे. 15 दिवस पुरेल एवढे साहित्य देण्यात आले आहे.  धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या संकटात सापडलेल्या कुटुंबाना मदतीचा हात देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष गोविंद कराड, अँड. महारुद्र कराड , सचिन कराड ,धोंडिबा दिवटे, संदीपान मुंडे ,संदीप दिवटे ,विठ्ठल मुंडे ,अशोक बनसोडे , महादेव मुंडे, बिभीषण मुंडे,अनिल कराड,निकेस बनसोडे ,बंडू पाटील कराड,राम कराड स्वप्नील फड आदी उपस्थित होते.
      कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील तसेच जिल्ह्यातील व तालुक्यातील, गावातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. लॉक डाऊन मध्ये थोडीशी शिथिलता मिळाली असली म्हणजे लाँक डाऊन संपले असे नाही. उलट या काळात  सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष गोविंद कराड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment