तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 25 May 2020

आता 26 मे पासून संचारबंदीतून ११ तास शिथिलता आस्थापना दररोज सकाळी 7-30 ते सायंकाळी 6-30 पर्यंत


बीड (प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्यात संचारबंदी काळात आतापर्यंत एकदिवसाआड ७ तास सवलत देण्यात येत होती, मात्र आता रोज ११ तास संचारबंदीतून शिथिलता असणार आहे. ज्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे अशा सेवा वगळून सर्व आस्थापना आता रोज सकाळी ७:३० ते सायंकाळी ६; ३० पर्यंत सुरु राहणार असून सायंकाळी ७ ते सकाळी ७ यावेळेत कडक संचारबंदी लागू राहील.याकाळात केवळ अत्यावश्यक सेवा पास असणारेच प्रवास करू शकतील. असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत.
उद्यापासून बीड जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, हॉटेल, सिनेमागृह,व्यायामशाळा,प्रार्थनास्थळे, राजकीय सामाजिक कार्यक्रम, वगळता सर्व आस्थापना सुरु राहतील. तसेच सलून आणि केशकर्तनालये, पार्लर यांनाही सुरक्षा उपाययोजना करून परवानगी देण्यात आली आहे. कंटेनमेंट झोनमध्ये मात्र या सेवा सुरु नसतील. दारू दुकानांसाठी स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत. आता रोज ११ तास संचारबंदी शिथिल असल्याने लोकांनी गर्दी करू नये, गर्दी झाल्यास बाजारपेठ बंद करण्याचे आदेश देण्यात येतील असेही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहेे

No comments:

Post a comment