तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 22 May 2020

परळी तालुक्यातील मोहा व शहरातील प्रत्येकी 40 लोकांचे रक्त नमुणे केंद्रीय आर्युविज्ञान संस्थेने तपासली - तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांची माहिती
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
केंद्रीय अर्युविज्ञान संस्था दिल्ली आणि पुणे  येथील आरोग्य विभागाच्या ‘नारी’ या दोन वैद्यकीय संस्थांचे  डॉक्टरांचे पथक आज परळी तालुक्यातील मोहा गावचे 40 व परळी शहरातील माणीक नगर परिसरातील 40 नागरिकांच्या रक्त नमुणे तपासण्यासाठी चेन्नई येथे घेवून जाणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांनी माहिती दिली आहे.
तालुक्यातील एकुण 80 नागरिकांच्या रक्ताचे नमुणे घेऊन घेण्यात आले. हे संकलित केलेले रक्ताचे नमुणे चेनई येथील प्रयोगशाळेत पाठवुन यामध्ये या रक्त नमुण्यातून सामान्य लोकाला कोरोना रोगाची लक्षणेही न दिसता हे लोकं पॉझिटीव्ह येतात का? ज्या लोकांची इतर संसर्गजन्य रोगाला बळी पडतात का? त्यांची प्रतिकार शक्ती कशी आहे? या बाबी या रक्त नमुण्यातून तपासण्यात येणार असून जेणेकरून या रक्त नमुण्यातून देशभरातील लोकांची साथीच्या रोगाविषयाची प्रतिकार शक्ती, या साथरोगाला बळी पडणार्‍या लोकांची लक्षणे इत्यादी बाबी तपासून केंद्र सरकारला कोरोना रोगासह इतर साथ रोगावर प्रभावी उपाय योजना ठरवण्यासाठीचे धोरण आखायचे असल्यामुळे हे रक्ताचे नमुणे घेण्यात आल्याचे  तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांची माहिती दिली आहे.
        या पथकात मोहा येथे प्रकल्प तांत्रिक अधिकारी आदित्य बेंगले, वैद्यकीय अधिकारी  डॉ. जाधव किरण, डॉ. भोसले, आरोग्य कर्मचारी शिवाजी राठोड, बाळू राठोड, श्रीमती सोनटक्के, श्रीमती कराळे व आशा स्वसेविका तर परळी येथे प्रकल्प तांत्रिक अधिकारी डॉ. प्रितम मोरडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे, वैद्यकीय अधिकारी परळीच्या डॉ. नौशिन फातेमा सय्यद व आरोग्य कर्मचारी अशिष वाघमारे, औटी गणेश, काझी एन.आर., बर्दापुरकर, चव्हाण, सुजाता चव्हाण, आशा मुंडे, श्रीमती एमले, सावित्रीबाई राठोड व प्रभागातील आशावर्कर उपस्थित होते.

No comments:

Post a comment