तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 May 2020

मुंबई-पुणे मिञमंडळाला 5555 रुपयाची मदत देऊन केला अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा ; अजय संजय अघाव यांचे सर्वस्तरातुन कौतुक
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
सामाजिक राजकीय क्षेत्रात एक नावाजलेल व्यक्तीमत्व संजय आघाव यांचे चिरंजीव अजय संजय आघाव यांचा आज वाढदिवस अगदी साध्या व अनोख्या पध्दतीने साजरा करुन सामाजिक,धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या मुंबई-पुणे मिञमंडळाला 5555 रुपयाची मदतीने करुन वाढदिवस साजरा केला.अजय संजय अघाव यांचे सर्वस्तरातुन कौतुक होत आहे.
   सध्या महाराष्ट्र भयानक संकटात असताना वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करणे माझ्या सारख्या सार्वजनिक समाजकार्यांत काम करणारया एका सामान्य कार्यकर्त्यांला योग्य वाटले नाही म्हणून सतत सामाजिक कार्यात समाजसेवा करणारया मुंबई पुणे मित्र मंडळाला(सारडगाव) 5555/-रुपये  फुल ना फुलाची  पाकळीच्या रूपात मदत केली व ती रकम मंडळाचे अध्यक्ष फुलचंद अघाव यांच्याकडे सुपुर्त करण्यात आली आहे.या मुंबई-पुणे मिञमंडळात अजय आघावचा सक्रीय सहभाग आणी पुढाकार ही असतो.

No comments:

Post a comment