तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 May 2020

परळीच्या बीडिओंनी कोरोणा व्हायरस संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा साधला 70 ग्रामपंचायतीशी साधला संवाद ;सरपंच, ग्रामसेवक, शासकीय सेवकांना केले महत्वपूर्ण मार्गदर्शन

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी ) :- राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा  वाढता प्रादुर्भाव पाहता आपल्या भागामध्ये कोरोना व्हायरसची लागण होऊ नये यासाठी घ्यावयाची दक्षता आणी उपाययोजना याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी परळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी परळी तालुक्यातील 70 ग्रामपंचायतीच्या माध्यमातून  350 ग्रामपंचायतीचे पदाधिकारी शासकीय सेवकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बहुमोल मार्गदर्शन केले. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे कोरोणा व्हायरस संदर्भात ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करणारी परळी पंचायत समिती ही एकमेव ठरली आहे.
      परळी तालुक्यामध्ये परळी पंचायत समितीअंतर्गत एकूण 90 ग्रामपंचायती आहेत. 90 ग्रामपंचायतींपैकी काल गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी 68 ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, आशा वर्कर अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायतचे ऑपरेटर, रोजगार हमी योजनेचे ग्राम रोजगार सेवक अशा जवळपास 350 पदाधिकारी - शासकीय सेवकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
      ग्राम सुरक्षा पथक गावपातळीवर जे निर्माण केलेले आहेत त्यांनी नवीन रेड झोनमधून जे लोक बाहेरून येत आहेत अशांना क्वारंनटाईन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करून गट विकास अधिकारी संजय केंद्रे यांनी अंगणवाडी सेविका - आशा वर्कर यांनी परगावाहून आलेल्या लोकांच्या नोंदी घेऊन त्याची माहिती अॅपवर भरून बाहेरून आलेले लोकांची मागील आठ ते दहा दिवसाची त्याची हिस्ट्री तयार करावी त्यात ते कुठून आले, कुठे - कुठे थांबले, कोणकोणते जिल्हे पार केले याची इत्थंभूत माहिती या शीट मध्ये भरावी जेणेकरून शासनास योग्य ती कारवाई करण्यास मदत होईल.
        सरपंच आणि ग्रामसेवकांनी बाहेरगावाहून आलेल्या लोकांना क्वारंटाईन करून ठेवण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. वास्तविक पाहता क्वारंटाईन करून अशा लोकांनी घरातच राहणे अपेक्षित आहे मात्र गावाच्या लोकांच्या भावना लक्षात घेऊन बाहेरून आलेल्या लोकांना अंगणवाड्या, शाळा किंवा गावांमधील समाज मंदिरे आदी ठिकाणी क्वारंटाईन करून त्यांना त्यांच्या घरचे अन्न खाण्यास देऊन त्यांना त्या ठिकाणी वेगळे अठरा दिवस  ठेवावे. असे करीत असताना सर्व लोकांना गरीब-श्रीमंत, धर्म - जात भेद न करता सर्वांना समान वागणूक देऊन क्वारंटाईन करावे अशा मुद्यावर संजय केंद्रे यांनी प्रकर्षाने मार्गदर्शन केले कारण बर्याच वेळा ग्रामीण भागातून फार वाईट बातम्या येत आहेत की मोठ्या माणसांची माणसे आले की ते आल्या‌ आल्या आपल्या घरात जात आहेत आणि आम्ही गरीब असल्याकारणाने बाहेर आम्हास क्वारंटाईन करीत आहेत. म्हणून सर्वांना समान वागणूक देण्या विषयीचे बहुमोल मार्गदर्शन संजय केंद्रे यांनी यावेळी केले.
      तसेच ग्रामपंचायत ने बाहेर गावाहुन आलेले आणि जे क्वारंटाईन केलेले लोक आहेत त्यांना सोडून इतर आलेल्या लोकांनी जर मजुरीची मागणी केली की आम्हाला काम द्या म्हणून अशांना काम देण्यासाठी ग्रामपंचायतने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कामे द्यावीत जेणेकरून त्यांना रोजगार मिळेल आणि त्यांची उपासमार होणार नाही. त्याचबरोबर ग्रामपंचायत ने पावसाळापूर्व जी कामे आहेत ती करावीत त्यात नाल्यांची साफसफाई, नाल्या प्रवाहित करणे, कचर्याची ढीगे उचलणे आणि संपूर्ण गावात फवारणी करणे ही तीन महत्त्वाची कामे देखील ग्रामपंचायतने अग्रक्रमाने करावयाचे आहेत असेही संजय केंद्रे म्हणाले.
     
      "माणुसकीचा मुद्दा"
कोरोना व्हायरस संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि शासकीय सेवकांना मार्गदर्शन करत असताना एक माणुसकीचा मुद्दा  सांगितला तो असा की, आपल्या शेजारी कोणी उपाशी राहिला आहे का ते बघा, एक माणूस म्हणून अशा लोकांना मदत करा कारण अशा परिस्थितीमध्ये मदत केलेली माणूस आयुष्यभर विसरत नाही.

No comments:

Post a comment