तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 15 May 2020

शेगाव मध्ये पुन्हा पकडला गुटखा : 84 हजाराच्या मालासह आरोपी ताब्यातबुलडाणा, 15 मे :

दहा दिवसांपूर्वीच शेगाव येथे छापा मारून एलसीबीच्या पथकाने गुटखा पकडला होता.या सोबतच डोणगांव येथे सुध्दा काही दिवसा पुर्वी गुटखा पकडून सुध्दा कारवाईने सुद्धा गुटखा माफियांनी धडा घेतला नसल्याचे दिसत आहे. पोलिसांनी मात्र गुटखा माफियांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे सुरू केले आहे.त्याचाच परिणाम म्हणजे आज सकाळी 10 वाजेदरम्यान शेगावच्या बाजार फैलमध्ये 84 हजार रुपयांचा गुटखा पकडला गेला आहे.आरोपी इम्रान खान शराफत खान याला गुटख्याच्या मालासह ताब्यात घेण्यात आले आहे.ही यशस्वी कारवाई पीएसआय इम्रान इनामदार, एएसआय प्रकाश राठोड, पोना. लक्ष्मण कटक, रघुनाथ जाधव, श्रीकांत चिंचोले, हेकां. भारत राजपूत यांच्या पथकाने केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांनी गुटखा विरोधात तीव्र मोहीम छेडलेली आहे... एलसीबी कडून गेल्या अनेक दिवसांपासून गुटखा पकडण्याला नियोजनबद्ध गति देण्यात आली आहे.

No comments:

Post a comment