तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 15 May 2020

राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून शहीद जवान गणपत लांडगे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन


लातूर, दि.15 :- भारतीय सैन्यदलाच्या 6- महार रेजिमेंट मधील जवान  गणपत सुरेश लांडगे यांचे सियाचीन मध्ये कर्तव्यावर असताना श्वसनाचा त्रास होऊन ते शहीद झाले.
      शहीद जवान गणपत लांडगे यांचे पार्थिव दिनांक9 मे 2020 रोजी रात्री उशिरा लोदगा येथे दाखल झाले व दिनांक 10 मे 2020 रोजी सकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
     राज्याचे सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन, पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी लोदगा येथे शहीद जवान गणपत लांडगे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व शासनाकडून सर्व प्रकारची मदत देण्यात येईल अशी ग्वाही दिली. जिल्हा प्रशासनाने याबाबत तात्काळ कार्यवाही करून लांडगे कुटुंबीयांना मदत द्यावी असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी औसा रेणापूर चे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे औश्याचा तहसीलदार शोभा पुजारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment