तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 20 May 2020

परजिल्हा आणि परराज्यातुन मोठया प्रमाणत लोक स्वगृही लातूर जिल्हयात कोविड१९ चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आरोग्य आणि वैदयकीय शिक्षण यंत्रणांनी आरोग्य तपासणीची विशेष मोहिम हाती घ्यावी- ना. अमित विलासराव देशमुखलातूर (प्रतिनिधी) :- 
      परजिल्हा आणि परराज्यातुन मोठया प्रमाणात लोक लातूर जिल्हयात स्वगृही परतले आहेत. बाहेरून आलेल्या या मंडळीकडून जिल्हयात कोविड१९ चा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी आरोग्य आणि वैदयकीय शिक्षण यंत्रणाकडून आरोग्य तपासणीची विशेष मोहिम हाती घेण्यात यावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
    कोविड१९ च्या पार्श्वभुमिवर संपूर्ण देशात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात काही अंशी शिथीलता मिळाल्यानंतर परजिल्हा आणि परराज्यातुन मोठया प्रमाणात लोक लातूर जिल्हयात स्वगृही परतले आहेत. या बाहेरून आलेल्या मंडळीची तपासणी केली असता त्यांच्यात कोविड१९ ची लागण झालेले अनेक रुग्ण सापडले आहेत. गेली अनेक दिवस कोविड१९ मुक्त असलेल्या लातूर जिल्हयात या बाहेरून स्वगृही परतलेल्या नागरिकांकडून हा प्रादूर्भाव होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदरील बाब लक्षात घेऊन आरोग्य विभाग तसेच वैदयकीय शिक्षण विभागाच्या यंत्रणा मार्फत जिल्हयात पुन्हा एकदा आरोग्य तपासणीची विशेष मोहिम हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जेणे करून कोविड१९ ची लागण झालेला कोणी रुग्ण लातूर जिल्हयात आला असेल तर त्याचा वेळीच शोध लागेल आणि त्यावर उपचारही लवकरात लवकर होतील सर्वांत महत्वाचे म्हणजे अशा रूग्णापसुन जिल्हयात कोविड१९ चा प्रादुर्भावही वाढणार नाही असे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a comment