तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 20 May 2020

समाजसेविका ज्योती ठाकरे यांनी केले गरीबांना मास्क वाटप

वाशिम(फुलचंद भगत)-समाजसेविका ज्योती ठाकरे यांनी मंगरुळपीर येथील सरस्वती महिला बचत गटाला कापड,विलेष्टिक आणी ईतर साहित्य ऊपलब्ध करुन देवुन त्यांच्यामार्फत मास्क शिवुन घेतले आणी ते मास्क गरजु गोरगरींना वाटप करुन कोरोनाविषयी सुरक्षितता पाळन्याचे आवाहनही केले.
सध्या वाशिम जिल्ह्यातही कोरोनाने चांगलाच शिरकाव केल्याने सुरक्षितता म्हणून येथिल सरस्वती महिला बचत गटाला समाजसेविका ज्योती ठाकरे यांनी कापड,विलेष्टीक आणी इतर आवश्यक साहित्य ऊपलब्ध करुन देवुन त्या बचत गटातील महिलांनी मास्क शिवुन तयार केलेत.ते मास्क झोपडपट्टीमधील गरजु आणी गरीबांना वितरित करन्यात आले.कोरोनाविषयी आपली सुरक्षा आपणच घ्यायला हवी याविषयी लोकांना मार्गदर्शनही करन्यात आले.गरीबांना मास्क वितरण करन्याच्या ऊपक्रमाप्रसंगी समाजसेविका ज्योती ठाकरे,सविता इंगोले,अश्विनी भोयर तसेच सरस्वती महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री पाटील,सचिव सुजाता तुपवते, आणी सदस्या सिमा पाटील यांची ऊपस्थीती होती.ज्योती ठाकरे यांच्या ऊपक्रमामुळे बचत गटातील महिलांना रोजगार ऊपलब्ध होवून लोकांच्या कोरोनापासुन बचावासाठी मदतही मिळाली त्यामुळे त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे.

प्रतिनीधी-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment