तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 20 May 2020

खरीप हंगाम पीककर्ज मागणीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात यावी -खासदार हेमंत पाटीलहिंगोली प्रतिनिधी

हिंगोली : खरीप हंगाम 2020-21 साठी  पीककर्ज घेण्यास मोठ्या प्रमाणात  हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी इच्छुक आहेत, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ऑनलाइन नोंदणी सुरू करावी  असे निर्देश खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत .
                        जागतिक महामारी कोवीड -19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी घोषित करण्यात आली आहे . बँकेतील गर्दीमुळे होणारा विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सन 2020-21 या खरीप हंगामात हिंगोली  जिल्ह्यातील शेतकरी पीककर्ज घेण्यास इछुक असून जिल्हा प्रशासनाने शेतकरी हित लक्षात घेता हिंगोली जिल्ह्यात ऑनलाइन नोंदणी सुरू करावी असे खासदार हेमंत पाटील म्हणाले . नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांची यादी जिल्हा अग्रणी बँक हिंगोली मार्फत संबधित बँकेकडे पाठवून देण्यात यावी. त्यानंतर संबंधित बँक पुढील कार्यवाही शासनाच्या कार्यप्रणालीनुसार करणार आहे  असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले . खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली जिल्हा लोकप्रतिनिधीची धुरा हाती घेतल्यापासून शेतकरी हित जोपासले आहे . मागील चार वर्षापासून प्रलंबित असलेला पिकविमा यंदाच्या हंगामात 124 कोटीचा मंजूर करून घेतला . जिल्ह्यात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे लक्षात घेवून जिल्ह्यात हळद प्रक्रिया उद्योग उभारून हळद बोर्ड स्थापन करावा अशी मागणी वाणिज्य समितीकडे केली आहे . अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची  मागणी केली होती. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्वच अकरा तालुक्यात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करावेत . फळपिकांच्या साठवणुकीसाठी कोल्डस्टोरेज तयार करावेत .खरीप हंगामात शेतकऱ्यांना उत्तम व दर्जेदार खते ,बी-बियाणे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली आहे . याच अनुषंगाने सध्या किनवट  तालुक्यात मका ,ज्वारी , कापूस तर उमरखेड ,वसमत तालुक्यात कापसाची हमीभावाने खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे . यामुळे हिंगोली लोकसभा मतदार संघातील शेतकरी सुखावला असून या पार्श्वभूमीवर  पीककर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात यावी असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a Comment