तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 18 May 2020

मुलीच्या लग्नाचा अतिरीक्त खर्च दिला सीएम रिलिफ फंडाला;सारोळा येथील अल्पभूधारक शेतक-याची दानत.

किरण घुंबरे पाटील
पाथरी:- कधी नव्हे ते कोव्हिड-१९ विषाणूचे संकट जगभरावर घोंगावत आहे.या संसर्गजन्य अदृष्य दुष्मन असलेल्या विषाणू विरोधात युद्ध सुरू आहे.देशभात चौथा लॉकडाऊन सुरू झालाय. नित्य सर्व व्यवहार ठप्प झालेत. घरात बसून या कोरोना नावाच्या दुष्मनाला हारवने हाच एक उपाय आहे. या साठी राज्यातील, देशातील आणि जगभरातील डॉक्टर्स,नर्स, पोलीस,स्वच्छता कर्मी आदी मैदानात उतरून या दुष्मनाला संपवण्या साठी आपल्या जिवाची बाजी लावत आहेत. केवळ शेती क्षेत्राला लॉक डाऊन नाही. हे लॉकडाऊन करता ही येत नाही कारण जगण्या साठी लागती ती भाकरी आणि ती उत्पादित सकरतो तो शेतकरी म्हणून तर त्याला जगचा पोशिंदा म्हटले आहे. या काळात उर्जा देणारे अन्न तो अविरत पणे पिकवतोय कितीदा ही त्याची निसर्गाने,शासनाने हेळसांड केली असेल मात्र या सर्वांवर मात करत वेळोवेळी त्याची दानत जगा समोर येतच असते. कोरोणा नावाच्या संकटाने सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. यात लग्न समारंभही रद्द झालेत. मात्र आता पाच दहा नातेवाईक एकत्र येत प्रशासना कडून परवानगी घेऊन लग्न समारंभ छोटे खानी पण सोशल डिस्टंन्स चे नियम पाळून पुर्ण करत आहेत. असाच विवाह सोहळा सारोळा येथे मंगळवार १९ मे रोजी सकाळी अकरा वाजता पार पडला या आगोदर वधू मुलीच्या अल्पभूधारक शेतकरी वडिलांनी लग्नातून वाचलेले अकरा हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधी साठी पाथरीच्या तहसिलदारां कडे सुपूर्द करून शेतकरी कितीही संकटात असला तरी त्याची दानत कधीच कमी नसल्याचे पुन्हा एकवार सिद्ध केले.
या विषयी थोडक्यात माहिती अशी की सारोळा येथील अल्पभूधारक शेतकरी अर्जून किशनराव टाकळकर यांच्या न्यानेश्वरी या मुलीचा विवाह सुप्पा ता गंगाखेड येथील कृष्णा दिगंबरराव घोगरे यांच्या सोबत १९ मे रोजी निश्चित झाला होता. प्रशासना कडून परवानगी घेऊन दोन्ही कडील पाच पाच मानसे लग्न समारंभा साठी घेऊन येण्याचे निश्चित केले. या वेळी अर्जून टाकळकर यांनी सोमवार १८ मे रोजी लग्न समारंभातून वाचलेले अकरा हजार रुपये पाथरीचे तहसिलदार कांगने यांच्या मार्फत कोरोना संकटाशी सांमना करण्या साठी मुख्यमंत्री सहायता निधी साठी दिले.मृग नक्षत्र जवळ आले आहे. पेरणीच्या चिंतेत शेतकरी आहेत. अशातही मुलीच्या लग्नाचे वाचलेले पैसे हे या कोरोणा विषाणू विरूध्दच्या लढाई साठी या अल्पभूधारक शेतक-याने देत समाजा पुढे पुन्हा एकदा दानतीचा आदर्श ठेवला असून अर्जून टाकळकर यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

No comments:

Post a comment