तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 18 May 2020

सोनपेठ तालुक्यात सापडला कोरोनाचा पेशंट

सोनपेठ : तालुक्यात आज शेळगाव येथील महिला कोरोनाग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे, मुंबईचा रेड झोन मधून परभणी जिल्ह्यात दाखल झालेली एक महिला कोरोना आजाराने पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे....सोमवारी सायंकाळी यासंदर्भात अहवाल आला आणि परभणी जिल्ह्याची पुन्हा एकदा टेन्शन वाढले गेले खरे तर जिल्हा प्रशासनाने अतिशय दक्षता घेतली होती तरी देखील मुंबईच्या रेड झोनमधून परभणी जिल्ह्यात अनेक व्यक्ती दाखल होत आहेत आणि त्याचा फटका जिल्ह्यातील नागरिकांना बसतो आहे......
सोमवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार ही महिला सोनपेठ तालुक्यातील शेळगाव या ठिकाणी आली होती मुंबईवरून ती आली होती आता नेमका कोणता संदर्भ येण्यासाठीचा आहे याचा शोध घेतल्या जात आहे
सोनपेठ तालुक्यातील शेळगाव या गावी मुंबईहून परतलेल्या एका महिलेस कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
सोनपेठ येथील रुग्णालयात मुंबईहून परतलेल्या या महिलेने वैद्यकीय तपासणीकरिता दाखल झाल्यानंतर अधिका-यांनी तिचे स्वॅब घेतले व ते नांदेड येथील प्रयोगशाळेकडे पाठविले होते, असे संबंधित आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी  सांगितले. त्या स्वॅबचा सोमवारी(दि.18) अहवाल प्राप्त झाला असून ती 45 वर्षीय महिला कोरोना पॉझीटीव्ह असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने बोलतांना दिली.
जिल्हा प्रशासनाने शेळगाव गाव संपूर्ण प्रतिबंधित म्हणून घोषित केले असून आणखी खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत अशी माहिती देण्यात आली....

No comments:

Post a Comment