तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 May 2020

कोरोनाला रोखण्यासाठी वाघबेटमध्ये निर्जंतुकीकरण आणि सॅनिटाइझरचे मोफत वितरणबाहेरून आलेल्यांची पुर्ण तपासणी करूनच केले जाते क्वारंटाईन - अमरनाथ गित्ते

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण होऊ नये म्हणून आम्ही ग्राम पंचायतीच्या माध्यमातून पुर्ण खबरदारी घेत आहोत संपुर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले असुन नागरीकांना सॅनिटाइझरचे मोफत वितरण करण्यात आले असल्याचे वाघबेटचे सरपंच अमरनाथ गित्ते यांनी सांगितले तर बाहेरून आलेल्या नागरीकांची तपासणी झाल्यानंतरच त्यांना क्वारंटाईन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र आम्हाला शासकीय वैद्यकीय सेवा फार दूर होत असुन प्रशासनाने याबाबत कारवाई करून आमचे गाव परळीला जोडावे अशी मागणी त्यांनी केली. 
      वाघबेटमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. चोहीकडे कोरोनाचा बोलबाला असुन येथील युवक सरपंच अमरनाथ गित्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अगदी सुरूवातीपासूनच कोरोनाशी लढा द्यायला सुरुवात केली आहे. लाॅक डाऊनची घोषणा झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम गावात स्वच्छता मोहीम राबवून सर्वत्र निर्जंतुकीकरण केले. नागरीकांमध्ये जनजागृती करून संपूर्ण गावात सॅनिटाइझरचे मोफत वितरण करण्यात आले. लाॅक डाऊन आणि संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ आली. याची जाणीव ठेवून सरपंच गित्ते यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण गावात अन्नधान्याचे मोफत वाटप केले. कोणत्याही गरीबावर उपासमारीची वेळ येणार नाही याची खबरदारी घेतली आहे. 
        अमरनाथ गित्ते यांनी सांगितले की, आमच्या गावात बाहेरून येणारांचे प्रमाण अतिशय कमी आहे. आतापर्यंत केवळ वीस लोक बाहेरून आले असुन त्यांची तपासणी करून अगोदर त्यांना पंधरा दिवस क्वारंटाईन करून शेतात ठेवले आणि नंतरच गावात घेतले. कोरोनाच्या विरोधात आम्ही खंबीरपणे उभे असलो तरी प्रशासनाची अपेक्षित मदत मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आम्हाला आरोग्य केंद्र हे नागापूर असुन ते वाघबेटपासुन तब्बल वीस ते बावीस किलो मीटर आहे. त्यापेक्षा आम्हाला परळी जवळ आहे. प्रशासनाने आम्हाला परळीला जोडावे अशी मागणी त्यांनी केली. 
        गावात विजेचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अकरा गावासाठी एक सब स्टेशन आहे, तेथून वीजेचा अतिशय कमी दाबाने पुरवठा होतो. तर कधी अचानक दाब वाढतो आणि आमचे टी. व्ही., फॅन, बल्ब जळुन जातात. याप्रकाराने नागरीक वैतागून गेले आहेत. आम्ही वेळोवेळी संबंधितांकडे मागणी केली परंतु कोणी दखल घेत नाही. पाण्याचेही तेच हाल आहेत. आमच्याकडे माणसांना तर सोडाच पण जनावरांनाही पिण्यायोग्य नाही. त्यामुळे आमचे पाण्यासाठी हालहाल होत आहेत. प्रशासनाकडे मागणी केली तर तुम्हीच विहीर अधिग्रहित करा असे सांगत आहेत त्यामुळे आमची मोठी अडचण होत आहे. 
      आम्ही सध्या कोरोच्या विरोधात लढत आहोत मात्र ईतर आघाड्यांवरही आम्हाला काम करावे लागत आहे. असे असले तरी आम्ही कोरोनाला आमच्या गावात प्रवेश देणार नाही असा विश्वास अमरनाथ गित्ते यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a comment