तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 May 2020

गायरान जमीनीवर जनहिताचे शासकिय कार्यालय बांधा, घाण कचरा टाकण्यास विरोध पेठशिवणी ग्रांमपंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना लेखी तक्रार निवेदन


           


आरूणा शर्मा
 पालम = प्रतिनिधि शहरात तालुक्याच्या जनहिताचे शासकीय कार्यालय बांधकामासाठी जागा नसल्याच्या कारणावरून मंजुरी प्रलंबित आहेत. भविष्यात तालुक्याच्या विकासासाठी शासकीय कार्यालय बांधकामासाठी पेठशिवणी येथील सरकारी गायरान जमीन वापरावी, मात्र पालम नगरपालिका यांच्या घाण कचरा टाकण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतचा विरोध असल्याचे लेखी तक्रारी निवेदन जिल्हाधिकारी परभणी यांना ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले आहे.                    पालम हे तालुक्याचे ठिकाण असून अजूनही जनतेच्या हिताची सर्व शासकीय कार्यालय येथे नाहीत तसेच या ठिकाणी वरिष्ठ शासकीय अधिकारी व आमदार, खासदार ,मंत्री महोदय यांना थांबण्यासाठी विश्रामग्रह नाही येथे एसटी बस स्थानक नाही मागासवर्गीय मुला-मुलीसाठी शासकीय वस्तीग्रह नाही,तसेच काही कार्यालय खाजगी भाड्याने जागेमध्ये कार्यरत आहेत.अशी दुर्दैवी अवस्था या तालुक्याची आहे.                                          पालम तालुक्याचे राजकीय पक्षाचे पुढारी शहरातील स्वतःच्या जागा शासकीय कार्यालयाला देण्यास नकार देत आहेत यामुळे तालुक्याच्या विकासाला खीळ बसलेली आहे.                               पेट शिवनी हे गाव पालम ते लोहा राज्य महामार्गावर असून याठिकाणी सरकारी गायरान जमीन आहे याच सरकारी गायरान जमिनीवर तालुकास्तरीय शासकीय आयटीआय विद्युत लाईट विभागाचे 33 केव्ही उपकेंद्र असून गायरान लगत मुर्डेश्वर संस्थेचे जुनियर कॉलेज कार्यरत आहे.सदरील सरकारी गायरान जमिन ही मोक्यावर असून भविष्यात या ठिकाणी पालम तालुक्याच्या विकासासाठी एमआयडीसी तसेच प्रस्तावित असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र, 132 केंद्र ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामग्रह व उपविभागीय कार्यालय पालम एसटी बस स्टँड आधी कार्यासाठी सरकारी गायरान जमिनीचा वापर करावा जेणेकरून जनतेचे हित जोपासली जाईल व तालुक्याच्या विकासाला गतवैभव प्राप्त होईल यासाठी आमची ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे. मात्र पालम च्या काही राजकीय पुढाऱ्यांनी नगरपंचायतीच्या अंतर्गत शहरातील घाण कचरा टाकण्यासाठी पेट शिवनी सरकारी गायरान जमीन मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे .सरकारी गायरान जमीन ताब्यात घेण्याची घाई गडबड नगरपालिकेला झाली असून जमीन मोजण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू ठेवलेला आहे नगरपंचायतीची घाण कचरा पेट शिवनी येथे आणून टाकल्यास बहुतालच्या परिसरातील शासकीय आयटीआय व मुरडेश्वर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोकादायक समस्या निर्माण होणार आहे. तसेच अवतीभोवतीच्या शेतकऱ्यांच्या आखाड्या वरील राहणाऱ्या लोकांना ह्या गोष्टीचा व दुर्गंधीचा त्रास उद्भवणार आहे यासाठी ग्रामपंचायत पेठशिवणी यांनी घाण कचरा टाकण्यास नकार असल्याबाबतचा ठराव घेऊन जिल्हाधिकारी परभणी परभणी यांना लेखी तक्रारी निवेदनाद्वारे आपली भूमिका कळविलेली आहे यामुळे पालम नगरपंचायतीचे नगरसेवक व पेठशिवणी गावकरी यांच्यात वादविवाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

No comments:

Post a comment