तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 May 2020

कँसरवर मात करून साडे सहा एकरात घेतले सेंद्रिय केळीचे उत्पादनविभागीय कृषि संचालक डॉ.डी.एल.जाधव,राजेसाहेब देशमुख यांचेकडून सेंद्रिय केळींची पहाणी

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- 
येथील प्रयोगशील शेतकरी किसनराव भोसले यांनी वर्षभर कँसर या दुर्धर आजारावर योग्य औषधोपचार केले.कँसरवर मात करून सेंद्रिय बागायती शेतीला प्राधान्य देत साडे सहा एकरांत केळी हे पीक घेतले आहे.त्यांच्या या प्रयोगाची माहिती घेण्यासाठी विभागीय कृषि संचालक डॉ.डी.एल.जाधव आणि जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी भेट घेवून केळीची पहाणी करून कौतुक केले.भविष्यात सेंद्रिय शेतीतून प्रगती कशी साधता येईल याबाबत शेतकरी किसनराव भोसले यांना मार्गदर्शन केले.


अंबाजोगाई शहरात औरंगाबाद विभागीय कृषि संचालक डॉ.डी.एल.जाधव आणि जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी  येथील प्रयोगशील शेतकरी किसनराव भोसले यांची भेट घेऊन भोसले यांच्या सेंद्रिय शेतीतून पिकवलेली केळी पिकाचे कौतुक केले.बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीसाठी पुढाकार घ्यावा.राज्य सरकारने शेतकरी बांधवांचा आर्थिक फायदा झाला पाहिजे या विधायक भूमिकेतून निर्णय घेत शेतक-यांना थेट बाजारात भाजीपाला व फळे विकण्यासाठी परवाने दिले आहेत.जेणेकरून मध्यस्थांची साखळी तोडून शेतक-यांना मोठा फायदा होणार आहे.अशी माहिती विभागीय कृषि संचालक डॉ.एल.जाधव यांनी दिली.
याप्रसंगी शेतक-यांच्या गटाचे प्रतिनिधित्व करताना जिल्हा परीषद सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी मानवी जीवनाला घातक ठरतील असे कीटकनाशके वापरणा-या शेतक-यांना किंवा अशा शेतक-यांच्या गटांना फळे व भाजीपाला विक्रीचे परवाने देवू नयेत.तर सेंद्रिय व नैसर्गिक शेती करणारे शेतकरी गटांना परवाने द्यावेत अशी मागणी राजेसाहेब देशमुख यांनी केली.याप्रसंगी प्रयोगशील शेतकरी किसनराव भोसले,रयत क्रांती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष मोरे,तालुका कृषि अधिकारी   जी.एस.श्रीखंडे,मंडळ कृषि अधिकारी बी.बी.शेळके,जे.डी.ठाकुर,आर.डी.बर्वे,शाखाप्रमुख सी.जी.तोडकर,पञकार रणजित डांगे,धनंजय किसनराव भोसले आदींची उपस्थिती होती.किसनराव भोसले या शेतक-याने जून-2018 मध्ये साडेसहा एकर क्षेत्रांत जी-नाईन या जातीच्या केळीची लागवड़ केली.सध्या बाजारात फळांचे बीट बंद आहे.लॉकडाउनमुळे बाहेरच्या बाजारातही माल घेऊन जाता येत नव्हता.त्यामुळे या बिकट  परिस्थितीचा सामना करीत स्वता:च स्टॉल लावून किसनराव भोसले हे केळी विकत आहेत.याकामी त्यांना धनंजय व संजय या मुलांची मोठी मदत मिळत आहे.यावर्षी केळीची 8 हजार झाडे चांगली जोपासली.यंदा केळीला चांगला माल लागला.भोसले यांचा बागायती शेती व केळी पिकावर सुमारे साडे आठ लाख रूपये एवढा खर्च झाला आहे.साडेसहा एकर केळी आहे.यासाठी रासायनिक खतांचा वापर न करता,सेंद्रिय खत व फवारणी करूनच ही सेंद्रिय बाग पिकविली आहे.सेंद्रिय पध्दतीने उत्पादित केलेली व नैसर्गिकरित्या पिकवलेली केळी स्वतःच विक्री करीत आहोत.ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

किसनराव भोसले यांची आदर्श सेंद्रिय शेती

कँसर सारख्या दुर्धर आजारावर मात करून किसनराव भोसले यांनी सेंद्रिय शेतीत प्रयोग सुरू केले.गेली 15 दिवसांपासून अंबाजोगाई शहरात ते सेंद्रिय केळी विकत आहेत.कोणतेही रासायनिक खते,कीटकनाशके न वापरता फक्त सेंद्रिय खते वापरून आणि नैसर्गिकरित्या पिकवलेली
केळी जनतेने खरेदी करून सेंद्रिय शेतीला पाठबळ व शेतक-याला आर्थिक नफा मिळवून द्यावा.त्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी बांधवांनी किसनराव भोसले यांचा आदर्श समोर ठेवून सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे,विभागीय कृषि संचालक डॉ.डी.एल.जाधव यांचे माध्यमातून पुढील काळात शेतक-यांच्या आयुष्यात सुगीचे दिवस येतील.याची खाञी आहे.

-राजेसाहेब देशमुख (जि.प.सदस्य,बीड.)सेंद्रिय शेतीने जमीनीचा पोत व शेतक-यांचे जीवनमान सुधारेल

लॉकडाउनमुळे केळीकडे व्यापारी फिरकेना झाला होता.त्यामुळे या परस्थितीवर मात करून नुकसान टाळण्यासाठी सेंद्रिय पध्दतीने उत्पादित केलेली व नैसर्गिकरित्या पिकवलेली केळी स्वतःच विक्री करीत आहोत.ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.शेतक-यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले तर शेतीचा पोत व शेतक-याचे जीवनमान सुधारेल.

-किसनराव भोसले (बागायतदार शेतकरी,अंबाजोगाई.)

No comments:

Post a comment