तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 22 May 2020

लॉकडाऊनच्या काळात शेती व्यवसायला मोठा फटका नागवेलीची पाने मोजतायत शेवटची घटका सर्व नागवेलीची पाने सध्या झाडावरच आहेतसाखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे.  परंतु या लॉकडाऊनचा फटका इतर उद्योगांसह शेतीव्यवसायलाही बसत आहे. नेहमी निसर्गाच्या अनिश्चितीचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कोरोना व्हायरसचा फटका बसत आहे.  दिड महिन्यांपासून सर्वच व्यवहार ठप्प असल्याचा फटका देशातील अर्थव्यवस्थेला सूद्धा बसत आहे.

सेनगाव तालुक्यातील असलेल्या पानकनेरगांव येथील शेती व्यवसाय असलेल्या नागवेलीच्या पानमळ्यांना सूद्धा मोठा फटका बसला आहे
जिल्ह्यातील शेकडो पानमळ्याने  प्रसिद्ध असलेल पानकनेरगांव या गावाची नावाने ओळख निर्माण झाली
पूरातण काळातील जवळपास ३०० ते ४०० पानमळे असायचे
आणि महाराष्ट्र्राच्या कानाकोपऱ्यातून व्यापारी येऊन पानाच्या डाकांना मागणी असायची

पण मात्र निसर्गाच्या लहरिपणाने दिवसेंदिवस पाणी पातळी घटत चालल्याने काही शेतकऱ्यांनी पानमळ्यावर नागर फिरवला त्यामूळे आता बोटावर मोजण्याइतकेच पानमळे शिल्लक आहेत
परंतु लाॅकडाऊ असल्यामूळे दूरवरून येणारे व्यापारी पाठ फिरवल्याने व तसेच मजूर मिळत नसल्यामुळे शेतकर्यांचे पानमळ्यातील पाने तसेच पडून आहेत यामुळे शेतकरी अर्थीक संकटात कोलमडून गेला आहे
लॉकडाऊनमुळे गेल्या दिड महिन्यांपासून
सर्व व्यवहार, व्यवसाय व वाहतूक बंद असल्याने शेतमालाच्या उठावावर मोठा परिणाम झाला. दरम्यान, जीवनावश्यक वस्तूंमध्ये भाजीपाल्याची विक्री काही प्रमाणात होत आहे; मात्र फळपिकांवर मात्र कमालीची मर्यादा आली आहे. त्यातल्या त्यात तालुक्यातील पानकनेरगांव येथील बोटावर मोजता येतील इतकेच पानमळ्यांतील लाखो पाने जागेवरच खराब होत असल्याने गेल्या ५० दिवसांत जवळपास शेतकर्यांचे जवळपास लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे.
तालुक्यातील पानकनेरगांव शिवारात पानमळ्यांची संख्या जवळपास प्राचिन काळापासून ३०० ते ४०० घरात होती. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असल्याने ती संख्या कमी झाली. त्यात पाण्याची कमतरता हे मुख्य कारण होते. गेल्या दहा ते बारा वर्षांत अनेक शेतकऱ्यांनी पानमळे मोडीत काढले. सद्य:स्थितीत चार पानमळे शेतकऱ्यांनी मेहनतीने टिकवून ठेवले आहेत.


ऐन उन्हाळ्यात पानांचा दर्जा कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी मेहनत घ्यावी लागते. शेतकरी तशी मेहनत घेत आहेत; मात्र एका कोरोना विषाणूने जीवितहानी होत असल्याने संपूर्ण जग हादरून टाकल्याने केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन केले आहे. गर्दी व एकमेकांच्या संपर्कातून होणारा संसर्ग जीवितहानीसाठी कारणीभूत ठरत असल्याने सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य आहे; मात्र शेती पिकांच्या नुकसानीचे संकट शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी टाकत आहे. त्याची भरपाई कोण देणार, या विवंचनेत शेतकरी आहेत.

लाखो पाने झडताहेत
उन्हाळ्यात पानांची जपणूक मोठ्या मेहनतीने करावी लागते. लॉकडाऊनमुळे पानटपऱ्या बंद आहेत. स्थानिक व्यापारीही येत नाहीत. शिवाय पानांची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या भूसावळ येथे माल जाणारा बंद असल्याने शेतकर्यांचे अर्थीक नूकसान होत आहे

  एका पानमळ्यातील सरासरी दहा डाग पाने बाजारपेठेत गली असती. एका डागेत २० हजार पाने असतात. त्याला साधारणतः दोन ते चार हजार रुपये मिळतात; परंतु वाहतूक बंद आहे.

शिवाय बाजारपेठाही बंद असल्याने मागणी होत नाही. या गावात पानमळ्यांचे शेतकरी उठाव नसल्याने अडचणीत आले आहेत. पंधरा दिवसांच्या काळात पानमळ्याचे मालकांचे जवळपास लाखांचे उत्पन्न बुडाले आहे. यापुढील पंधरा दिवसांचा काळही असाच कठीण असल्याने आणखी  लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे.

 दरम्यान, पानकनेरगांव शिवारात कलकत्ता पानाचे एक लाख खर्च करून उत्पन्न घेण्याचा प्रयत्न प्रशांत आकमार यांनी केला; पण आता ऐन पानाची प्रत्यक्ष मागणी असताना बाजारपेठेपर्यंत पान पोचविणे कठीण झाले आहे.

निसर्गाचा फटका बसल्यानंतर पानमळ्याचे नुकसान यापूर्वीही शेतकऱ्यांना सहन करावे लागले आहे. आता लॉकडाऊनमुळे पानांच्या विक्रीला ब्रेक लागला आहे. उठाव नसला तरी वेलीला झडलेल्या आणि परिपक्व झालेल्या पानांची तोड करावीच लागते. त्यासाठी येणाऱ्या मजुरीचा खर्च वाया जातो आहे. एक एकरातील पानमळ्यातील पानांची विक्रीच थांबल्याने पंधरा दिवसांत पन्नास हजारांचे नुकसान सहन करावे लागले. आता पंधरा दिवसांतील दुसरी तोडही वायाच जाणार आहे.


प्रतिक्रिया- प्रशांत आकमार


पानमळ्याची शेती मोठ्या मेहनतीने पिकवावी लागते. विक्रीला आलेले पाने आता भुईला वाया घालवावे लागत आहेत. कलकत्ता पानांची पहिल्या शेतीचा प्रयोग यशस्वी होत असतानाच लॉकडाऊनमुळे विक्री ब्रेकडाऊन केल्याने पाने जागेवरच खराब होत आहेत. निब्बरलेले एक-एक पान आता काढून टाकावे लागत आहे. ५०  दिवसांत ३० ते ४० हजारांचे नुकसान सहन करावे लागत आहे. राज्य सरकारने पानमळ्याचा फळबाग योजनेत समावेश करून नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे.


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे  मो.नंबर 8007689280

No comments:

Post a Comment