तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 22 May 2020

हळदीचे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत शेतकऱ्यांवर हळद यंदा रुसली भाव वाढयची चिन्हे नाहीतकीड पडल्याने उत्पादनात जाली घट खर्च निघनेहि कठिन 


साखरा  प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा खडकी बोरखेडि कापडशिंगि या भागातील शेतकरी हळदिचे पीक घेत आहेत  या भागातील हळदीचे बरेच शेतकरी पीक घेतात खरीप पेरणी पूर्वी हळदीचे भाव कवडी मोल जाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा धोतरा सह आदी गावामध्ये शेतकरी उन्हाळी मशगती ची कामे करण्यात मग्न आहेत शेतीची खरीप पेरणी पूर्व तयारी करून खत बि यांची जुळवाजुळवी करत आहेत पेरणी साठी घरात ठेवलेली हळद बाजार पेठेत विक्री साठी नेली जात आहे परंतु गेल्या दोन महीन्यापासून लॉक डाऊन असल्यामुळे शेत मालाचे भाव चांगलेच कोसळले आहेत गेल्या वर्षी हळदीला 6 हजार भाव होता मात्र या वर्षी हळदीला 5हजार भाव मिळत आहे प्रति किण्टल मिळत आहे दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे हळदीला लागणार उत्पादन खर्च हि मोठ्या प्रमानात आहे भाव कोसळल्याने उत्पादनखर्च हि निघणे कठिन जाले आहे पेरणी करण्यासाठी बि बियाणे खताची जुळवाजुळवी करण्यासाठी शेतकऱ्यांना हळद विक्री करावी लागत आहे  या मुळे या परिसरातील हळद उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे व या वर्षी हळदी वर मोठ्या प्रमाणात हुमणी हळी करप्या रोग मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे हळदीच्या उत्पादनात मोठी घट जाली आहे


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment