तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 31 May 2020

थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी लावुन उर्वरित शेतकर्‍यांना कर्ज वाटप करण्याबाबत बँकांना आदेश द्या - खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या जिल्हाधिकारी यांना सूचना


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
        पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. बँकांनी थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या लावाव्यात आणि उर्वरित सर्व शेतकऱ्यांना कर्जासाठी पात्र गृहीत धरून पुढील कारवाई करण्याबाबत सर्व बँकांना आदेश द्यावेत अशा सूचना खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिल्या आहेत. 
        सध्या पेरणीचे दिवस आहेत. बळीराजा पेरणीसाठी सरसावला आहे पण कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी पीक कर्जाची आवश्यकता आहे. मात्र यासाठी बँका बेबाकी प्रमाणपत्र मागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांना सहजरीत्या कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी सर्व बँकांनी थकबाकीदारांची यादी लावावी आणि उर्वरित सर्व शेतकरी कर्जासाठी पात्र गृहीत धरून पुढील कारवाई करण्यासाठी बँकांना आदेश द्यावेत अशा सूचना खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिल्या आहेत.

No comments:

Post a comment