तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 21 May 2020

माजलगाव, धारूर, परळी तालुक्यातील २० गावे सील


बीड (प्रतिनिधी):-  माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे ११, सुर्डी येथे ०१ आणि धारूर तालुक्यातील कुंडी येथे ०१ कोरोनाग्रस्त आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने या गावांच्या तीन किलोमीटरच्या परिसरात येणारी माजलगाव, धारूर आणि परळी तालुक्यातील एकूण २० गावे कंटेनमेंट झोन घोषित करून सील केली आहेत.
माजलगाव तालुक्यातील नित्रुड, रेखानाईक तांडा, मोहकुळ तांडा, चंद्रभान तांडा, हरजळा तांडा, शेरी तांडा, बडेवाडी (आनंदवाडी), साळवण तांडा, सुर्डीनजीक, राजेगाव, फुलसिंगनगर आणि वांगी या गावांचा परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला. तर, धारूर तालुक्यातील कुंडी, जैतापूर, सुकळी, मुंगी, शेरीतांडा तहत (देवठाना), फकीर जवळा आणि परळी तालुक्यातील तपोवन,, खामगाव या गावांचाही परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. ही सर्व गावे अनिश्चित कालावधीसाठी बंद करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

No comments:

Post a comment